ETV Bharat / city

अनिल देशमुख यांचे जावई आणि वकिलांना सीबीआयने घेतले होते ताब्यात - महाराष्ट्र लेटेस्ट न्यूज

Breaking
Breaking
author img

By

Published : Sep 1, 2021, 6:48 AM IST

Updated : Sep 1, 2021, 10:32 PM IST

22:30 September 01

अनिल देशमुख यांचे जावई आणि वकिलांना सीबीआयने घेतले होते ताब्यात

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि वकील आनंद डागा यांना सीबीआयने ताब्यात घेतले होते. वरळी सुखदा येथून सीबीआयाने त्यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, सीबीआयने गौरव चतुर्वेदी यांचा जबाब नोंद केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. गरज पडल्यास चतुर्वेदी यांना पुन्हा हजर राहावे लागेल अशा सूचना देखील सीबीआयने दिल्या आहेत.

20:03 September 01

मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. राज्यपाल नामनिर्देशित 12 सदस्यांबाबत राज्यपालांनी नेमका काय निर्णय घेतला आहे याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.  

19:41 September 01

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेणार राज्यपालांची भेट

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. राज्यपाल नामनिर्देशित 12 सदस्यांबाबत राज्यपालांनी नेमका काय निर्णय घेतला आहे याबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट घेण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी राज्यपालांची भेट घेऊन या संदर्भात वेळ मागितली होती. या नंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना 1 सप्टेंबरला भेटण्याची वेळ दिली होती. त्यानुसार आज संध्याकाळी साडेसात वाजता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री राज्यपालांची भेट घेऊन 12 सदस्यांच्या नियुक्तीच्या मुद्द्याबाबत चर्चा करणार आहेत. 

15:22 September 01

डॉक्टर असलेल्या भाजप नगराध्यक्षाचे गर्भवती महिलेशी अश्लील चाळे

बीड - गर्भवती महिलेची सोनोग्राफी करायची असा बहाणा करून डॉक्टरने सोनोग्राफी सेंटरमध्ये तिच्याशी अश्लील चाळे करत जातीवाचक बोलून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही  घटना धारूरमध्ये मंगळवारी दुपारी घडली. सदरील डॉक्टर भूलतज्ज्ञ असून, धारूरचा भाजपचा नगराध्यक्ष आहे. डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकाराने राजकीय व आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. डॉ. स्वरूपसिंह हजारी (वय अंदाजे ६०) असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे.  

13:22 September 01

लोकांच्या जीवापेक्षा आपला अजेंडा महत्वाचा मानू नका, गृहमंत्र्यांचे राज ठाकरेंना आवाहन

मुंबई - केंद्र सरकारच्या बँकिंग क्षेत्रामुळे सहकार क्षेत्रात परिणाम होणार आहे. यासाठी विचार गट स्थापन केला आहे. त्यानुसार आवश्यकतेनुसार सुधारणा केल्या जातील. या संदर्भातील सादरीकरण करण्यात आले, असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाने ९७व्या घटना दुरूस्तीसंदर्भात दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने सहकार कायद्यात करावयाच्या सुधारणांबाबत व बँकिंग नियमन अधिनियमात केंद्र शासनाने केलेल्या सुधारणांचा सहकारी बँकांवर होणारा परिणाम याबाबत आज सह्याद्री अतिथीगृह इथे बैठक पार पडली, त्यामध्ये झालेल्या चर्चेवर वळसे पाटील बोलत होते.

जगात परिस्थिती पाहतोय आपण कोरोनाच्या तिसया लाटेची शक्यता आहे.  पहिल्या लाटेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता आणखी कोरोनामुळे तोटा होऊ शकतो. माझी सगळ्यांना विनंती आहे, लोकांच्या जिवापेक्षा आपला अजेंडा महत्वाचा मानू नका. सगळ्यांनी सहकार्य करा, असे आवाहन त्यांनीही वळसे पाटील यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांना  केले. तसेच ठाणे सहाय्यक आयुक्त यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी ठाणे पोलिसांना सूचना दिल्या आहेत. तात्काळ कायदेशीर कारवाई होईल असेही ते म्हणाले.

13:20 September 01

अभिनेत्री सायरा बानो यांची तब्येत बिघडली, हिंदूजामध्ये उपचार सुरू

अभिनेत्री सायरा बानो यांची तब्येत बिघडली

- हिंदुजा रुग्णालयात आयसीयूत दाखल

- सकाळी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती

- दिलीप कुमार यांच्या आहेत त्या पत्नी

- नुकतेच दिलीप कुमार यांचा झाला मृत्यू

13:13 September 01

लिस्ट मधला 12 वा खेळाडू जितेंद्र आव्हाड -सोमय्या

नाशिक- भाजपाचे माजी खासदार हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांनी आपली नामी आणि बेनामी संपत्ती जाहिर करावी, असे आवाहन केले. भुजबळ यांची 120 कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. आज मी भुजबळ यांची आर्म स्ट्रॉंग एनर्जी कंपनीची पाहणी केली. या कंपन्यांमध्ये जो पैसा आला आहे तो कुठून आला. आर्म स्ट्रॉंग कंपनीत भुजबळ यांनी आपला पैसा पांढरा केला असल्याचा आरोप केला आहे.

मुंबईत देखील मी भुजबळ यांच्या भुजबळ महालची पाहणी करायला जाणार आहे. मुंबईत बांधलेल्या करोडो रुपयांच्या घरासाठीला पैसा कुठून आणले. भुजबळ मुंबईत ज्या 9 मजली घरात राहतात ते कुणाचे आहे. भुजबळ यांच्या निगडीत अनेक बोगस कंपन्या आहेत, असाही सोमय्या यांनी केला आहे. 

-मुख्यमंत्री आणि शरद पवार यांना माझा आवाहन आहे, की भुजबळ मुंबईत ज्या घरात राहतात ते घर कुणाचे आहे हे शोधून दाखवावे. पनवेल, नाशिक,अंधेरी,सांताक्रूझ याठिकाणी असलेली मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली असल्याचेही ते सोमय्या म्हणाले. 
 
- लिस्ट मधला 12 वा खेळाडू जितेंद्र आव्हाड असल्याचेही सूचक वक्तव्य किरीट सोमैय्या यांनी केले आहे.

- *पुढची नोटीस जितेंद्र आव्हाडांना का? हा सवाल केला असता, सोमय्यानी हसून उत्तर टाळले

12:52 September 01

बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर दगडफेक

नांदेड - सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर दगडफेक, अनोळखी महिलेने केली दगडफेक.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या दगडफेकीचे कारण  अद्याप अस्पष्ट आहे.

12:23 September 01

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात फेरीवाल्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळेंची घेतली भेट

12:20 September 01

माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी दिली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या निवासस्थानाला भेट

नागपूर - देशाचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या निवासस्थानाला भेट दिली आहे. संघ मुख्यालयापासून काहीच अंतरावर डॉ. हेडगेवार यांचे निवासस्थान आहे. त्यानंतर सरन्यायाधीश शरद बोबडे आणि संघ मुख्यालयात सुद्धा गेले होते, त्याठिकाणी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत आणि सहकार्यवाहक भैय्याजी जोशी यांची भेट झाली असल्याचे वृत्त पुढे आले आहे.

सरसंघचालक मोहन भागवत आणि माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यात काही वेळ चर्चा झाली,मात्र त्या चर्चेचा विषय नेमका कोणता होता, या बाबत माहिती पुढे आलेली नाही. माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा या दौऱ्याबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. काही ठराविक स्वयंसेवकांच्या व्यतिरिक्त इतर कुणालाही या बाबत माहिती देण्यात आली नव्हती.

12:19 September 01

किरीट सोमैय्या आर्मस्ट्रॉंग कंपनी बाहेर दाखल...

किरीट सोमैय्या आर्मस्ट्रॉंग कंपनी बाहेर दाखल झाले आहेत. छगन भुजबळ यांच्या मालमत्तेची सोमय्यांकडून पाहणी कऱण्यात आली. दरम्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

12:12 September 01

किरीट सोमय्या यांनी केला खासदार भावना गावळीवर आणखीन एक गंभीर आरोप

-किरीट सोमय्या यांनी केला खासदार भावना गावळीवर आणखीन एक गंभीर आरोप

-एका ट्रस्टचे महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेत रूपांतर करून 70 कोटी रुपयांची मालमत्ता आपल्या स्वीय सहाय्यकाच्या नावावर केल्याचा आरोप

-यासाठी भोगस कागदपत्रे वापरण्यात आल्याचा केला आरोप

-या प्रकरणाची चौकशी करण्याची आमची मागणी

-सोमय्या आज नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी भावना गवळींवर हे आरोप केले आहेत

11:42 September 01

मनसे प्रमुख राज ठाकरे फेरीवाल्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळेंची भेट घेणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे महापालिकेच्या महिला अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहेत. पिंपळे यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका फेरीवाल्यांनी हल्ला केला होता या पार्श्वभूमीवर राज ठाकरे ही भेट घेणार आहेत. राज यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती यामध्ये देखील त्यांनी या घटनेचा निषेध केला होता. 

11:21 September 01

भाजपा नेते किरीट सोमय्या नाशिक दौऱ्यावर

-पालकमंत्री छगन भुजबळ यांचया मालमत्ता संदर्भात पाहणी करून घेणार आढावा

-काही दिवसांपूर्वी भुजबळ यांची करोडो रुपयांची प्रॉपर्टी आयकर विभागाने जप्त केल्याची सोमय्या यांनी केला होता आरोप

-शिलापूर येथील आर्म स्ट्रॉंग कंपनीची पाहणी करून घेणार पत्रकार परिषद

11:21 September 01

संजय राऊत यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे

10:07 September 01

घरगुती विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ, ग्राहकांना फटका

पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. आता प्रति सिलिंडर 25 रुपयांनी महाग झाला आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. ही दरवाढ विनाअनुगानिक गॅससिलिंडरसाठी लागू असणार आहे. आता दरवाढीनंतर दिल्लीत 14.2 kg चा सिलिंडर  884.50 रुपयांना मिळणार आहे. तर 19-kg व्यावसायिक गॅससिलिंडरच्या दरातही तब्बल 75 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.  त्यामुळे हा सिलिंडर भरून घेण्यासाठी  Rs 1693 मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ आजापासून लागू होईल.

09:45 September 01

नागपुरात डेंग्युचा धोका कायम, २८४ घरात पुन्हा आढळल्या डेंग्युच्या अळ्या

नागपुरात डेंग्युचा धोका कायम, २८४ घरात पुन्हा डेंग्युच्या अळ्या  आढळल्या आहेत. तसेच रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत

09:43 September 01

पर्यावरणाचे संरक्षण व्हावे यासाठी देवी-देवतांच्या पीओपीच्या मूर्तीवर बंदी कशी घालणार? - नागपूर खंडपीठ

नागपूर - पर्यावरणाचे संरक्षण व्हावे यासाठी देवी-देवतांच्या प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजेच पीओपीच्या मूर्तींवर कसे बंधन घालणार? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांना खंडपीठाकडून विचारणा करण्यात आली आहे. मागील सुनावणीत नागपूर खंडपीठाने पीओपीच्या देवी-देवतांच्या मूर्तीची विक्री करता येईल, पण विसर्जन करण्यावर बंदी घातली होती. त्यामुळे आता केंद्र आणि राज्य सरकारचे पर्यावरण विभाग तसेच दोन्ही प्रदूषण नियंत्रण मंडळ खंडपीठाला काय उत्तर देतात याकडे लक्ष असणार आहे,

08:34 September 01

मुंबईत मंगळवारी रात्री एनसीबीची विविध ठिकाणी छापेमारी

07:41 September 01

माजी आमदार आर एम वाणी यांचे अल्पशा आजाराने निधन

06:21 September 01

big breaking

कोल्हापूर - पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आजपासून पाच दिवस पदयात्रा काढणार आहे. चिखली ते नृसिंहवाडी  दरम्यान ही पदयात्रा मार्गक्रमम करणार आहे. तसेच मागण्या मान्य न केल्यास 5 सप्टेंबर रोजी नृसिंहवाडी येथे पंचगंगा कृष्णा नदीच्या संगमावर हजारो शेतकऱ्यांसह जलसमाधी घेण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

Last Updated : Sep 1, 2021, 10:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.