ETV Bharat / city

संगमेश्वर महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी बेमुदत संप - संगमेश्वर महाविद्यालय बातमी

संगमेश्वर महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी आजपासून बेमुदत संपाला सुरुवात केली. यावेळी संगमेश्वर महाविद्यालयातील तसेच सुटा (सोलापूर विद्यापीठ टीचर असोशिअशन) संघटनेचे पदाधिकारी प्रा. खांडेकर, प्रा. तुपेरे, प्रा. मोहोरकर, उपप्राचार्य मेत्री, प्रा. कावळे, प्रा. देशमुख सर यांनी या संपास जाहीर पाठींबा दिला.

संगमेश्वर महाविद्यालय
संगमेश्वर महाविद्यालय
author img

By

Published : Dec 28, 2021, 9:23 PM IST

Updated : Dec 28, 2021, 10:22 PM IST

सोलापूर - मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यासाठी संगमेश्वर महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी (non teaching staff of sangameshwar college) यांनी आजपासून बेमुदत संपाला सुरुवात केली. आश्वासित प्रगती योजनेच्या ग्रेड वेतनातील तफावती दूर करणे, सातवा वेतन आयोगातील ५८ महिन्यांची थकबाकी, जुनी पेन्शन योजना, पाच दिवसांचा आठवडा व नवीन शिक्षकेतर कर्मचारी भरती या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालय व विद्यापीठ सेवक संयुक्त कृती समितीने हा संप पुकारला आहे .

संगमेश्वर महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी बेमुदत संप

हेही वाचा - Mangalwedha Accident : टेम्पो आणि कारचा भीषण अपघात; सांगलीतील दोघांचा मृत्यू

संगमेश्वर महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी आजपासून बेमुदत संपात (indefinite strike ) सहभागी झाले. यावेळी संगमेश्वर महाविद्यालयातील तसेच सुटा (सोलापूर विद्यापीठ टीचर असोशिअशन) संघटनेचे पदाधिकारी प्रा. खांडेकर, प्रा. तुपेरे, प्रा. मोहोरकर, उपप्राचार्य मेत्री, प्रा. कावळे, प्रा. देशमुख सर यांनी या संपास जाहीर पाठींबा दिला.

हेही वाचा - Teacher Arrested : शिक्षकानं दाखवली 'कला'; रात्री करायचा पेट्रोल चोरी

या संपात विद्यापीठातील कर्मचारी, सेवक कृती समिती कर्मचारी व पदाधिकारी आनंद व्हटकर, संतोष याटकर, दत्तात्रय पवार, शीतल गवळी, नबी शेख, आरती येवले व संगमेश्वर महाविद्यालयातील सौ. दीपाली करजगीकर, मेघराज मंद्रूपकर, महेश सुरवसे, वैजिनाथ स्वामी, अप्पा काळे, रेवप्पा कोळी, हरिश्चंद्र कांबळे, चिदानंद स्वामी व संगमेश्वर, वसुंधरा, दयानंद, सोशल महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Last Updated : Dec 28, 2021, 10:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.