सोलापूर - वरिष्ठ वैद्यकीय अध्यापक व महिला अध्यापकांना वैद्यकीय शिक्षण सचिव यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध सोलापुरात ( Agitation Against Secretary of Medical Education ) करण्यात आला. डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांनी धरणे आंदोलन करत काम बंद केले ( Government Medical College Teachers ) आहे. यामुळे शासकीय महाविद्यालयातील सर्व कामकाज ठप्प झाले आहे. डॉ. व्ही. एम. शासकीय महाविद्यालय सलंग्नीत असलेले छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयावर या आंदोलनाचा परिणाम झाला नाही. तेथील सर्व कामकाज आणि रुग्णसेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती आंदोलकांनी दिली.
विविध मागण्या घेऊन गेले होते वैद्यकीय शिक्षण सचिवांकडे - राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काम करणाऱ्या प्राध्यापकांनी ( Government Medical College Teachers ) आपल्या विविध मागण्या घेऊन 3 फेब्रुवारी, 2022 रोजी वैद्यकीय शिक्षण सचिवांकडे गेले होते. पण, कोरोनामुळे मोजक्याच प्राध्यापकांना भेटण्याची वेळ वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. सौरव विजय यांनी दिली. त्यानुसार मेडिकल कॉलेज मधील काही मोजके पदाधिकारी वैद्यकीय शिक्षण सचिवांना भेटण्यासाठी गेले, मात्र त्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेता, अरेरावीची भाषा वापरली, असा आरोप आंदोलकांनी सांगितले. आपल्या विविध मागण्याचे निवेदन स्वीकारण्याऐवजी अपमानास्पद वागणूक देण्यात आली. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सोलापूरसह राज्यभरात वैद्यकीय शिक्षण सचिवांचा निषेध केला जात आहे.
रुग्ण सेवेवर परिणाम नाही - डॉ. व्ही. एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नीत असलेले छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवेवर याचा कोणताही परिणाम झाला नाही. वैद्यकीय शिक्षण सचिवांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्यभरातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे.
- या आहेत मागण्या
- अनेक शासकीय रुग्णालयात डॉक्टर किंवा सहायक प्राध्यापक वर्षानुवर्षे तात्पुरत्या स्वरूपात काम करत आहेत त्यांच्या सेवा नियमित कराव्यात.
- प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील अनेक पदे रिक्त असून त्या रिक्त पदावर काम करण्यास पात्र व इच्छूक उमेदवार उपलब्ध आहेत. पण, तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक देण्यात आलेल्यांना कायम करावे.
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांचे वेतन सातवा वेतन आयोगनुसार होते. पण, भत्ते सहाव्या वेतन आयोगानुसार मिळतात. भत्तेही पूर्णतः सातव्या वेतन आयोगानुसार लागू करावे.
- कोरोना काळात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना जोखीम भत्ता द्यावा.
हेही वाचा - Health Minister on PCPNDT : पीसीपीएनडीटी कायद्याची पायमल्ली होत असेल तर कडक कारवाई होणार - आरोग्य मंत्री