ETV Bharat / city

Gajanan Maharaj Palkhi : गजानन महाराज पालखीचे सोलापूरकरांनी केले स्वागत - विठ्ठल रुख्माई मंदिर पंढरपूर

गजानन महाराजांच्या पालखीचे ( Gajanan Maharaj Palkhi ) आज सोलापूर शहरात आगमन झाले आहे. या पालखी सोहळ्याचे सोलापूरकरांनी गुलाब पुष्पवृष्टी करून स्वागत केले. सोलापूर शहर पोलीस ( Solapur City Police ) प्रशासनाकडून पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, ( Police Commissioner Dr. Rajendra Mane ) उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर यांनी वारकरी टोपी परिधान करून गजानन महाराज पालखाची पूजा केली आहे.

Palkhi welcome from city police administration
सोलापूर शहर पोलीस प्रशासनाकडून पालखीचे स्वागत
author img

By

Published : Jul 3, 2022, 4:45 PM IST

सोलापूर- शेगाव निवासी संत गजानन महाराजांच्या पालखीचे ( Gajanan Maharaj Palkhi ) आज सोलापूर शहरात आगमन झाले आहे. सोलापूरकरांनी अतिशय आनंदी वातावरणात गुलाबपुष्पवृष्टी करून पालखी सोहळ्याच स्वागत केले. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, ( Police Commissioner Dr. Rajendra Mane ) उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर, सहायक पोलीस आयुक्त माधव रेड्डी, जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, यांनी पालखीला वंदन करून दर्शन घेतले. पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, तसेच डीसीपी डॉ. वैशाली कडुकर यांनी वारकरी टोपी परिधान करून गजानन महाराज पालखाची पूजा केली आहे.

Gajanan Maharaj Palkhi : गजानन महाराज पालखीचे सोलापूरकरांनी केले स्वागत

हेही वाचा - Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष झालेल्या राहुल नार्वेकरांचा राजकीय प्रवास...

Gajanan Maharaj's palanquin arrives in Solapur today
गजानन महाराजांच्या पालखीचे आज सोलापूर शहरात आगमन

संत गजानन महाराज पालखीचे 53 वे वर्ष- सोलापूर शहरात संत गजानन महाराज पालखी दाखल होताच सोलापूर शहर पोलीस ( Solapur City Police ) प्रशासनाकडून परंपरागत पद्धतिने स्वागत करण्यात आले. गजानन महाराज पालखीच हे ५३ वे वर्ष असून कोरोनामुळे मागचे दोन वर्ष वारकऱ्यांना पायी वारीला मुकावे लागले होते. सोलापूर शहरामध्ये गजानन महाराज पालखीचा सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस मुक्काम असणार आहे. त्यामुळे सोलापूर मधील वारकरी भाविकांमध्ये आनंदाच वातावरण आहे. रविवारी सकाळी सम्राट चौक येथे 11 वाजता सदगुरु प्रभाकर महाराज मंदिरात आगमन झाले आहे. तसेच दुपारी 4 वाजता सोलापुरातील कुचन प्रशाला येथे आगमन मुक्काम असणार आहे. सोमवारी सकाळी उपलप मंगल कार्यालय येथे आगमन, पालखीचा मुक्काम आहे. उपलप मंगल कार्यालय येथे सकाळी 9 वाजल्यापासून भाविकांना पालखीचे दर्शन घेता येईल. मंगळवारी सकाळी 6 वाजता श्री संत गजानन महाराज पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.

Palkhi of Gajanan Maharaj
गजानन महाराजांच्या पालखी

हेही वाचा - Rahul Narvekar Assembly Speaker : विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड, सर्वात तरुण अध्यक्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.