ETV Bharat / city

Drainage Work Deaths Solapur : मजुराला वाचविण्याकरिता गेले... चारही जणांनी ड्रेनेजमध्ये गमाविले प्राण, दोन गंभीर - सोलापूर अक्कलकोट महामार्ग ड्रेनेज काम

ड्रेनेजमध्ये काम करताना आवश्यक असणारे कोणतेही संरक्षण साहित्य मजुरांकडे ( No Protective equipment for drainage work ) नव्हते. त्यामधून सोलापूर महानगरपालिकेचा निष्काळजीपणाचा ( Careless Solapur Corporation ) कळस दिसून आला आहे. महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी ताबडतोब सरकारी रुग्णालयात धाव घेतली आहे. चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन आयुक्तांनी ( Solapur Commissioner P Shivshankar on labor deaths ) दिले आहे.

सोलापूर ड्रेनेज मजूर मृत्यू
सोलापूर ड्रेनेज मजूर मृत्यू
author img

By

Published : Dec 24, 2021, 12:51 AM IST

Updated : Dec 24, 2021, 1:26 PM IST

सोलापूर- सोलापूर अक्कलकोट महामार्गावर असलेल्या सादुल पेट्रोल पंपासमोर ड्रेनेजमध्ये काम करत असताना चार मजुरांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. चारही मृतदेह सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले आहेत. तर जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ड्रेनेजमध्ये काम करताना आवश्यक असणारे कोणतेही संरक्षण साहित्य मजुरांकडे ( No Protective equipment for drainage work ) नव्हते. त्यामधून सोलापूर महानगरपालिकेचा निष्काळजीपणाचा कळस दिसून आला आहे. मृतांमध्ये तिघे परप्रांतीय आहेत. तर एक मजूर महाराष्ट्राचा असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर ( Solapur Commissioner P Shivshankar on labor deaths ) यांनी ताबडतोब सरकारी रुग्णालयात धाव घेतली आहे. चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.

घटनेची माहिती देताना समाजसेवक
हेही वाचा-ST Worker Death in Rajapur : निलंबित एसटी कर्मचाऱ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; मृतदेह घेण्यास नातेवाईकांचा नकार

एकमेकांना वाचवण्यासाठी गेले आणि प्राण गमावले
प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी एक मजूर ड्रेनेजमध्ये काम करण्यासाठी उतरला. पण, आत ड्रेनेजमध्ये ऑक्सिजन नसल्याने सुरुवातीला उतरलेल्या मजुराला श्वास गुदमरु लागला. त्याला वाचवण्यासाठी तीन जणांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र, ड्रेनेजमधील विषारी वायूने चौघांना चक्कर आली. श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. चौघांना ड्रेनेजमधून बाहेर येता आले नाही. गुदमरून त्यांनी जीव सोडला. चौघांना वाचविण्यासाठी पुन्हा दोन मजूर उतरले. त्यांनादेखील बाहेर पडता आले नाही. आजबाजूच्या नागरिकांना ही माहिती मिळताच त्यांनीदेखील बचावकार्य सुरू केले. या प्रयत्नातून दोघांना वाचविण्यात आले.

हेही वाचा-दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; मुदतीनंतर परीक्षा अर्ज भरल्यास आता विलंब शुल्क लागणार नाही

मृतामध्ये तीन परप्रांतीयांचा समावेश
सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर ड्रेनेजचे काम सुरू होते. दास या कंपनीकडे याचा ठेका देण्यात आला आहे. बैचन परमु ऋषीदेव (वय 36 वर्ष, रा. रेवाडी गुहारी, कण्हेरी, जि. अटरीया, राज्य बिहार), आशिषकुमार भारतसिंग राजपूत(वय 17 वर्ष, रा. मगना लहू, अहीरवा मैनपुरी, उत्तरप्रदेश), सुनील गुलजारीलाल ढाका (वय 20 वर्ष, रा. सीलारपुरी, झुंझुनू घरडाना, राजस्थान), विशाल हिप्परकर (वय 25 वर्ष, रा. कडलास रोड, ता. जत जि सांगली) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. तर सैपन शेख (रा, नवीन विडी घरकुल, सोलापूर) व हरिशंकर(रा, उत्तर प्रदेश) हे दोघे जखमी झाले आहेत.

हेही वाचा- Shakti Bill In Assembly 2021 : शक्ती कायदा विधानसभेत एकमताने मंजूर; या कायद्याने काय होणार? वाचा..

Last Updated : Dec 24, 2021, 1:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.