पंढरपूर ( सोलापूर ) : श्री विठ्ठल आश्रमात दुपारच्या जेवणामध्ये बासुंदी, पत्ता कोबी, बेसन, चपाती, भजीचा समावेश होता.संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आश्रमातील विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब, पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने पंढरपूर येथील उपजिल्हा रूग्णालयांमध्ये सर्व बालकांना आणि पुरुषांना दाखल करण्यात आले. बाधितांपैकी दहा ते पंधराजणांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. पंढरपूरमध्ये नुकतीच आषाढी वारीचा सोहळा मोठ्या संख्येने संपन्न झाला. यात्रा कालावधीमध्ये भेसळीचे पदार्थ आढळून आले होते. तर औषध प्रशासनाने काही पेढे विक्रेत्यांवर कारवाई केली होती.
सर्वांची प्रकृती स्थिर - पंढरपूर येथील उपजिल्हा रूग्णालयात ( Upazila Hospital Pandharpur ) ३० ते ३२ विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले. जेवणानंतर आपण बासुंदी, पत्ताकोबी, बेसन, खाल्याने विषबाधा झाल्याचे रूग्णाकडून सांगण्यात आले आहे. तर सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती उपजिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद गिराम यांनी ( Upazila Medical Officer Dr Arvind Gira ) दिली आहे. विषबाधा झालेले सर्व विद्यार्थी हे श्री विठ्ठल आश्रमामध्ये धार्मिक शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये काही स्थानिक तर काही वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थी आहेत.
मोठा वार्षिक सोहळा - संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठा अध्यात्मिक सोहळा पंढरपूर ( Pandharpur ) येथे आषाढी एकादशी ( ( Ashadi Ekadashi ) निमित्ताने होत असतो. या आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये लाखो भावी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दाखल होत असतात. ही वारी अध्यात्म बरोबरच मोठी आर्थिक उलाढाल करून जाते. आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर मध्ये व्यवसायाची मोठी तेजी असते. विविध व्यवसायाच्या रूपाने कोट्यावधी रुपयांची वाढल पंढरपूर मध्ये आषाढी एकादशीनिमित्त होत असते. मोठ्या व्यवसायकांबरोबर छोटे व्यवसायिक सुद्धा आषाढी एकादशीमध्ये चांगली आर्थिक उलाढाल करतात, परंतु पंढरपूरमध्ये गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे भाविकांनी खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसले होते.
हेही वाचा : Maharashtra Corona Update : राज्यात रविवारी 2186 नवे कोरोनाबाधित; तिघांचा मृत्यू