सोलापूर - शहरात आणि जिल्ह्यात मिळून शनिवारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाच हजाराच्या पार गेली आहे. शनिवारी 324 नवे रुग्ण वाढले आहेत. शनिवारी शहर व ग्रामीणमध्ये सर्वाधिक म्हणजे 3144 अहवाल प्राप्त झाले आहेत. सोलापुरात एकूण रुग्ण संख्या 5 हजार 295 झाली आहे.
सोलापूर शहरात शनिवारी 1083 अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 938 निगेटिव्ह तर, 145 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यामध्ये 94 पुरुष व 51 महिलांचा समावेश आहे. शनिवारी सोलापूर शहरात 4 मृतांची नोंद झाली आहे. तर, 59 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
सोलापूर ग्रामीणमध्ये 18 जुलै रोजी सर्वाधिक म्हणजे 2061 चाचणी अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 1882 निगेटिव्ह तर 179 पॉझिटिव्ह रुग्ण बाधित मिळून आले आहेत. यामध्ये 117 पुरुष आणि 62 महिलांचा समावेश आहे. ग्रामीणमध्ये 54 रुग्णांना उपचारानंतर ठीक झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. तर, दोन रुग्ण कोरोनामुळे मृत झाले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्ण : शहर 3702, ग्रामीण 1593
एकूण रुग्ण 5295,
मृत: शहर 322, ग्रामीण 43
एकूण 365