ETV Bharat / city

Road Accident in Solapur : दर्शनासाठी आलेल्या अहमदनगरच्या पाच भाविकांचा सोलापुरात अपघाती मृत्यू - सोलापूर पाच भाविकांचा अपघाताता मृत्यू

सोलापूर-अक्कलकोट-गाणगापूर महामार्गावर कर्नाटक हद्दीत बळुरगी गावाजवळ भरधाव कार झाडावर आदळली. या अपघातात कारमधील चार महिला व चालक जागीच ठार (Five Death in Accident in Solapur) झाल्याची घटना घडली आहे. हे सर्व अहमदनगरचे Ahmednagar Devotees Car Accident रहिवासी आहेत.

accident
अपघात झालेली गाडी
author img

By

Published : Mar 11, 2022, 9:25 PM IST

Updated : Mar 11, 2022, 9:57 PM IST

सोलापूर - सोलापूर-अक्कलकोट-गाणगापूर महामार्गावर कर्नाटक हद्दीत बळुरगी गावाजवळ भरधाव कार झाडावर आदळली. या अपघातात कारमधील चार महिला व चालक जागीच ठार (Five Death in Accident in Solapur) झाल्याची घटना घडली आहे. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. अपघात एवढा भीषण होता की, पाचही जण जागेवरच ठार झाले आहेत. हे सर्व प्रवासी अहमदनगरचे रहिवासी Ahmednagar Devotees Car Accident आहेत.

  • अहमदनगरचे चार जण मृत आणि दोघे जखमी -

बाबासाहेब सखाराम वीर, कोमल बाबासाहेब वीर, राणी बाबासाहेब वीर, अणव हिराबाई, छाया बाबासाहेब वीर यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. तर साहिली बाबासाहेब वीर, चैत्राली दिनकरा सुरवशी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

  • दर्शन घेऊन परत अहमदनगरकडे जाताना झाला अपघात-

कारमधील सर्वजण कर्नाटकातील प्रसिद्ध दत्त मंदिर गाणगापूर येथील दर्शन करून अक्कलकोट मार्गे अहमदनगरकडे जात होते. अहमदनगरवरून या मृतांचे नातेवाईक घटनास्थळाकडे निघाले आहेत. ते आल्यावरच रात्री उशिरा तक्रार दाखल होईल, अशी माहिती अफझलपूरचे पीएसआय विश्वनाथ मुदरेड्डी यांनी दिली.

Last Updated : Mar 11, 2022, 9:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.