ETV Bharat / city

अघोरी कृत्य : स्मशानभूमीत जळत्या चितेवर बाहुली आणि कोंबडी - cemetery at solapur

पद्मशाली स्मशानभूमीत भानामती किंवा जादूटोण्याचा प्रकार समोर आला आहे. एका जळत्या चितेवर कोंबडी, बाहुली, लिंबू, नवीन कपडे आदी साहित्य आढळले आहे.

cemetery
स्मशानभूमी
author img

By

Published : Aug 27, 2021, 9:38 PM IST

Updated : Aug 27, 2021, 9:51 PM IST

सोलापूर - अक्कलकोट रोड येथील पद्मशाली स्मशानभूमीत भानामती किंवा जादूटोण्याचा प्रकार समोर आला आहे. एका जळत्या चितेवर कोंबडी, बाहुली, लिंबू, नवीन कपडे आदी साहित्य आढळले आहे. हा भानामती, जादूटोणा किंवा करणीधरणीचा प्रकार असून, असे घृणास्पद किंवा अघोरी कृत्य करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. मेल्यानंतर देखील मृतदेहाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. स्मशानभूमीत असे अघोरी कृत्य झाल्याने नागरिकांमधून संतापाची लाट पसरली आहे.

माहिती देताना मृताचे नातेवाईक

पद्मशाली स्मशानभूमीत मृतदेहांची विटंबना-

सतीश कृष्णहरी सामल (वय 48) यांचे निधन झाले होते. निधन झाल्यावर मृताच्या नातेवाईकांनी मृतदेहावर अंतिम संस्कार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी विधीसाठी गेले असता त्यांच्या नातेवाईकांच्या मृतदेहाची विटंबना झाल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ स्मशानभूमीत विश्वस्तांकडे तक्रार केली. मृतदेहावर मेलेली कोंबडी, बाहुली आणि लिंबू टाकले होते. मृतदेहाच्या नातेवाईकांनी भानामतीचे सर्व साहित्य बाजूला करून विधी पूर्ण केले.

स्मशानभूमीत अघोरी प्रथा सर्रास होते-

गेल्या अनेक महिन्यांपासून सोलापुरातील विविध स्मशानभूमीत अशा अघोरी प्रकार होत आहेत. बुधवार, शनिवार या दिवशी कोंबड्या, लिंबू, सुया जळत्या चितेवर टाकल्या जात आहेत. मृतदेहाची विटंबना होत आहे. स्मशानभूमीत काम करणारे कर्मचारी देखील उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आणि स्थानिक प्रशासनाने यावर सखोल चौकशी करून तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Last Updated : Aug 27, 2021, 9:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.