ETV Bharat / city

सोलापूर : राम मंदिरात पाच हजार दिवे लावून देव दीपावली साजरी - श्रीराम मंदिर सोलापूर

कार्तिक पौर्णिमेचा सण म्हणजे देव दीपावली होय. संपूर्ण उत्तर भारतात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. जगातील सर्वात प्राचीन शहर काशी येथील परंपरा आहे. सोलापूर शहरातील राम मंदिरात ही परंपरा जपली जात आहे. दिवाळी झाल्यानंतर पंधरा दिवसांनी देव दीपावली साजरी केली जाते. सोमवारी सोलापूर शहरात नागरिकांनी देव दीपावली साजरी केली.

dev deepawali celebration in shreeram mandir solapur
दिवे
author img

By

Published : Dec 1, 2020, 10:07 AM IST

सोलापूर - दरवर्षी प्रमाणे यंदा ही कार्तिकी पौर्णिमेला सोलापूर शहरातील राम मंदिर पाच हजार दिव्यांनी उजळून गेले होते. हजारो भाविकांनी भगवान श्री रामाचे दर्शन घेतले आणि राम मंदिरात दिवे लावले. या दिव्यांनी राम मंदिरात रोषणाई झाली होती. दरवर्षी कार्तिकी पौर्णिमेला देव दीपावली साजरी केली जाते.

देव दीपावली..
कार्तिक पौर्णिमेचा सण म्हणजे देव दीपावली होय. संपूर्ण उत्तर भारतात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. जगातील सर्वात प्राचीन शहर काशी येथील परंपरा आहे. सोलापूर शहरातील राम मंदिरात ही परंपरा जपली जात आहे. दिवाळी झाल्यानंतर पंधरा दिवसांनी देव दीपावली साजरी केली जाते. सोमवारी सोलापूर शहरात नागरिकांनी देव दीपावली साजरी केली.

राम मंदिरात पाच हजार दिवे लावून देव दीपावली साजरी
विधिवत कार्यक्रम..
सोमवारी सकाळी राम मंदिरात पारायण झाले. दुपारी भगवान श्रीरामाना नैवेद्य दाखवून आरती करण्यात आली. संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आरती करून धार्मिक प्रवचन झाले आणि दिवे लावण्यास सुरुवात झाली.
पाच हजार दिवे लावले..
सोलापूर शहरातील पूर्व भागात प्रसिद्ध असे श्री राम मंदिर आहे. देव दीपावली निमित्त येथे दरवर्षी देव दिवाळी निमित्त दरवर्षी या मंदिरात दिवे लावण्यात येतात. यंदाच्या वर्षी देखील सोमवारी कार्तिक पौर्णिमेला पाच हजार दिवे लावण्यात आली. भक्त गण येथील मंदिरात येतात आणि तेल, वात आणि पणत्या लावतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.