ETV Bharat / city

Demonstration strength MIM : सोलापूरात एमआयएमचे जोरदार शक्ती प्रदर्शन

सोलापूर महानगरपालिकाच्या ( Solapur Municipal Corporation) निवडणूक येत्या दोन महिन्यांत होतील. त्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष तयारीला लागला आहे. याचे औचित्य साधून एमआयएमने ( MIM strong show in Solapur ) शक्ती प्रदर्शन केले आहे. राष्ट्रवादीचा महापौर करण्याकरिता राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठंमोठ्या नेत्यांना आयात करून आपलं पक्ष बळकट करत आहेत. तर, भाजपा आपल्या नेहमीच्या हिंदुत्ववादी मुद्द्यावर ( Hindu issues ) लढणार की काय असा प्रश्न पडला आहे.

MIM march in Solapur
एमआयएमचा सोलापूरात मोर्चा
author img

By

Published : Jun 12, 2022, 3:42 PM IST

Updated : Jun 12, 2022, 4:24 PM IST

सोलापूर - सोलापूर महानगरपालिकाच्या ( Solapur Municipal Corporation) निवडणूक येत्या दोन महिन्यांत होतील. त्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष तयारीला लागला आहे. याचे औचित्य साधून एमआयएमने ( MIM strong show in Solapur ) शक्ती प्रदर्शन केले आहे. राष्ट्रवादीचा महापौर करण्याकरिता राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठंमोठ्या नेत्यांना आयात करून आपलं पक्ष बळकट करत आहेत. तर, भाजप आपल्या नेहमीच्या हिंदुत्ववादी मुद्द्यावर ( Hindu issues ) लढणार की काय असा प्रश्न पडला आहे. काँग्रेस पक्ष आमदार प्रणिती शिंदेच्या( Congress MLA Praniti Shinde ) नेतृत्वाखाली आपला 60 वर्षांचा किल्ला जिंकेल का नाही अशी चर्चा सोलापूरात रंगली आहे. एमआयएमने शक्ती प्रदर्शन करून "हम भी किसीसे कम नही" असा संदेश दिला आहे.

सोलापूरात एमआयएमचे जोरदार शक्ती प्रदर्शन

एमआयएमने घेतला मोर्चाचा आधार - एमआयएमने 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीत मुसंडी मारत आपले अस्तित्व सिद्ध केले होते. मात्र, तत्कालीन एमआयएम नेत्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तर, अनेकांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या नेत्याला संधी दिल्याने नाराज झालेल्या तत्कालीन एमआयएम नेत्यांनी पार्टीला रामराम ठोकला आहे. तसेच अनेकांनी आपल्या हातात राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले आहे. एमआयएम पक्षाला गळती लागल्याने मुस्लिम समाजात नाराजीचे सूर दिसून येत आहेतत. विधानसभा निवडणुकीनंतर एमआयएमला मरगळ आली होती. ती मरगळ दूर करण्यासाठी पक्षाने विराट मोर्चा काढला. यात पक्षाच्या नेत्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रेषित मोहंमद पैगंबरांच्या समर्थनार्थ मोर्चा- भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा तसेच नवीन जिंदाल यांनी पैगंबरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यावर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुस्लिम समुदाय नाराज झाला आहे. त्यामुळे एमआयएमने त्याला आधार देत अचानकपणे 10 जून रोजी मूक मोर्चा काढल्याची घोषणा केली. सोशल मीडियावरून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन अनेक मुस्लिम बांधवाना करण्यात आले होते. एमआयएमने बोलावलेल्या मोर्चात एवढा मोठा समुदाय येईल याचा कोणालाही अंदाज नव्हता. पोलीस प्रशासन देखील हतबल होते. मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

एमआयएमने शक्ती प्रदर्शन दाखवली ताकद - एमआयएमच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक मुस्लिम बांधवानी सोलापुरात विराट मोर्चा काढला.अनेक दिवसापासून सोलापुरात भाजप,काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चर्चा होती. पण शुक्रवारी 10 जून रोजी काढलेल्या मोर्चाने आता एमआयएम पक्ष देखील चर्चेत आला आहे. सोलापूरच्या इतिहासात हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांचा एवढा विशाल मोर्चा कधीं झाला नव्हता. विराट मोर्चाला शहर प्रमुख फारूक शाब्दी यांनी संबोधित केले. आगामी महानगरपालिका निवडणूकित याचा फायदा एमआयएमला नक्की होईल असे चित्र निर्माण झाले आहे.

हेही वाचा- Dedication Of Tukaram Maharaj Shila Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार जगद्गुरु तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण

हेही वाचा- Uddhav Thackeray : राष्ट्रपतीपद निवडणूक.. ममता बॅनर्जींची बैठक.. उद्धव ठाकरे फिरवणार पाठ

हेही वाचा- Violence in Gujrat : गुजरातमध्ये दोन समाजांमध्ये संघर्ष, दगड- विटांचा पडला खच.. कॉन्स्टेबलसह चार जण जखमी

Last Updated : Jun 12, 2022, 4:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.