सोलापूर - गेल्या १००-१५० वर्षांपासून महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील गणवेशात कसे बदल होत गेले त्याबाबत बोलक्या छायाचित्रांचं लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पोलीस आयुक्त कार्यालयात पार पडला.या उदघाटन सोहळ्याला कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांची प्रमुख उपस्थिती होती.भारताच्या विविध राज्यातील पोलिसांचे गणवेश कसे होते याबाबत छायाचित्रे रेखाटण्यात आली आहेत. ती चित्रे पोलिस आयुक्तालयातील दर्शनी भागात लावण्यात आली आहेत.
पोलीस आयुक्त हरीश बैजल यांची संकल्पना - चित्रकार सचिन खरात यांनी ही चित्रे काढली आहेत. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, छाया बैजल, एसीपी डॉ. संतोष गायकवाड, दीपक आर्वे यांच्यासह पोलिस निरीक्षक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या पुढाकाराने ही संकल्पना राबविण्यात आली.
पोलीस अधीक्षक कार्यालयात देखील छायाचित्रे लावली जाणार - पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी या कलाकृतीचे कौतुक केले. पोलीस अधीक्षक कार्यालयातही अशी कलाकृती तयार करून घेते घेता येईल का? याबाबत नियोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच खरात यांच्या मदतीने मी देखील छायाचित्र काढण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले.