ETV Bharat / city

आईच्या थकीत पोटगी वसुलीसाठी मुलाची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाने दिले आदेश

वृद्ध आईला दरमहा दहा हजार रुपये पोटगी व राहण्यासाठी दोन खोल्या द्याव्यात, असे न्यायालयाचे आदेश असतानाही मुलगा व सुनेने पोटगी दिली नाही. यामुळे वृद्ध आईने न्यायालयात धाव घेतली. न्यायाधीश व्ही.वी. चव्हाण यांनी थकीत पोटगी एका महिन्याच्या आत भरण्याचे आदेश मुलाला दिले असून तो मुलाने थकीत पोटगी दिली नाही तर मुलाच्या संपत्ती जप्त करुन किंवा विक्री करुन थकित पोटगी जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 11, 2021, 4:45 PM IST

Updated : Apr 11, 2021, 10:33 PM IST

सोलापूर - वृध्द आई शारदा येमुल (वय 68 वर्षे, रा. न्यू पाच्छा पेठ, सोलापूर) यांची पोटगीची रक्कम दोन लाख तीस हजार रुपये थकीत ठेवल्याबद्दल न्यायालयाने मुलाची संपत्ती जप्त किंवा विक्री करुन थकीत पोटगी रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश सोलापुरातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.बी. चव्हाण यांनी दिले आहे.

माहिती देताना विधिज्ञ

आईस दरमहा दहा हजार पोटगी देण्याचा होता आदेश

वृध्द शारदा येमुल यांचा मुलगा रमेश येमुल व सून संध्या येमुल यांनी शारदा येमुल यांस राहत असलेल्या ठिकाणी सतत त्रास देऊन छळ करुन घरातून हाकलून दिले होते. तसेच त्यांच्या उपजिवीकेची सोय केली नव्हती. वृध्द शारदा येमुल यांच्यावतीने अ‌ॅड. श्रीनिवास कटकूर व अ‌ॅड. किरण कटकुर यांच्यामार्फत सोलापूर येथील कौटुंबिक न्यायालयात कौंटुबिक हिंसाचार कायदा, 2005 चे कलम 12 अन्वये पोटगी व राहण्यासाठी दोन खोल्या मिळाव्यात यासाठी फौजदारी खटला मुलगा व सुनेविरोधात दाखल केला होता. त्यानंतर या खटल्याची सुनावणी होऊन मुलाने आईस उपजिवीकेसाठी दरमहा दहा हजार रुपये पोटगी व राहण्यासाठी दोन खोल्या देण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता.

न्यायालयाच्या आदेशापासून दिली नाही पोटगी

आदेश केल्यापासून मुलाने कौटुंबिक कोर्टात कोणतीही पोटगीची रक्कम भरली नव्हती. यामुळे एकूण थकबाकी 2 लाख 30 हजार रुपये झाली होती. वृद्ध शारदा येमुल यांनी पुन्हा पोटगी रक्कम वसुलीसाठी न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर झालेल्या सुनावणीत मुलगा रमेश येमुल व सून संध्या येमुल यांस पोटगी रक्कम 2 लाख 30 हजार रुपये एक महिन्याच्या आत भरण्याचा आदेश केला आहे. पोटगी रक्कम नाही भरल्यास मुलगा रमेश येमुल यांची संपत्ती जप्त करुन ती विक्री करुन आलेल्या रक्कमेतून थकीत पोटगी रक्कम न्यायालयात भरण्याचा आदेश केला आहे. याबाबतचे वसुली आदेश संबंधित पोलीस ठाण्याकडे पाठवले आहेत.

मुलास न्यायालयाची चपराक

कोर्टाच्या आदेशामुळे मुलगा व सून या दोघांना कोर्टाची चपराक बसली आहे. तसेच जी मुले आपल्या आई-वडिलांच्या सांभाळ करत नाही त्यांना देखील अशीच चपराक बसावी शारदा येमुल यांच्या वकिलांनी सांगितले.

हेही वाचा - सोलापूरमध्ये दोन दिवस कडक संचारबंदी, विनाकारण बाहेर फिरल्यास होणार कारवाई

Last Updated : Apr 11, 2021, 10:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.