सोलापूर - संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर शहरात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीला विविध धान्याचे अभिषेक करून साजरा करण्यात आला. त्यानंतर ते अन्नधान्य गोरगरिबांना देऊन शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गहु ज्वारी बाजरी तांदूळ डाळ हरभरा या अन्नधान्याने शिवराज्याभिषेक केला
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे राजे होते. त्यांनी आपल्या सैनिकांना शेतकर्यांच्या भाजीच्या देठाला ही हात लावू नये, अशी सक्त ताकीद दिली होती. अशा लोककल्याणकारी राजा शिव छत्रपतींचा अभिषेक हा गहु, ज्वारी, बाजरी, तांदूळ, डाळ, हरभरा आदी धान्याने राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
गोरगरिबांना अन्नधान्य वाटप
कडक निर्बंध असल्याने सोलापुरातील गोरगरिबांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. गोरगरिबांना सद्यस्थितीत मदतीची खूप गरज आहे.यामुळे शिवराज्याभिषेक केलेले धान्य गोरगरिबांना देण्यात आले. हीच शिकवण महाराजांची होती असे मत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - एमआयएम पक्षाच्या वतीने सोलापुरात १ हजार लहान बालकांची आरोग्य तपासणी