ETV Bharat / city

CBI action in NTPC company : सोलापुरात सीबीआयची एनटीपीसी कंपनीत कारवाई; सुरक्षा अधिकाऱ्याला लाख रुपये लाच स्वीकारताना पकडले - एनटीपीसी सुरक्षा अधिकारी लाच सोलापूर

एनटीपीसीत एजन्सी म्हणून कार्यरत असलेल्या यूपीएल ( CBI action in NTPC company in Solapur ) कंपनीतील गोविंद कुमार या सुरक्षा अधिकाऱ्याला कंत्राटदार, पुरवठादार आणि कामगारांकडून ( security officer arrested for accepting bribe ) लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात ( security officer in NTPC arrested in bribe case ) आली आहे.

CBI action in NTPC company in Solapur
एनटीपीसी सुरक्षा अधिकारी लाच सोलापूर
author img

By

Published : Aug 7, 2022, 11:56 AM IST

सोलापूर - जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि केंद्र शासनाच्या मालकीची असणारी जिल्ह्यातील ( CBI action in NTPC company in Solapur ) एकमेव कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एनटीपीसीत शनिवारी दुपारी सीबीआयची मोठी कारवाई झाली आहे. एनटीपीसीत एजन्सी ( security officer arrested for accepting bribe ) म्हणून कार्यरत असलेल्या यूपीएल कंपनीतील गोविंद कुमार या सुरक्षा अधिकाऱ्याला कंत्राटदार, पुरवठादार आणि कामगारांकडून लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कंत्राटदाराने केलेल्या तक्रारीवरून सीबीआयने शनिवारी दुपारी एनटीपीसी कंपनीच्या आवारात छापा टाकून लाचखोर अधिकाऱ्याला ( security officer in NTPC arrested in bribe case ) रंगेहाथ पकडले. सीबीआयने त्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या लाच घेणारा संशयित आरोपी जेलरोड पोलीस ठाणे येथील कोठडीत आहे. यामुळे एनटीपीसीत भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

हेही वाचा - Tilak started Ganeshotsav : आजोबा गणपतीची प्रेरणा घेत लोकमान्य टिळकांनी सुरु केला सार्वजनिक गणेशोत्सव

यूपीएल कंपनीत कार्यरत होता - सोलापुरात केंद्रीय प्रकल्प एनटीपीसी सुरू झाल्यापासून अनेक खासगी कंपन्यांना ठेका मिळाला आहे. युटिलिटी पॉवरटेक लिमिटेड (युपीएल) या कंपनीला देखील ठेका मिळाला आहे. युपीएल कंपनीत गोविंद सेफ्टी ऑफिसर म्हणून कार्यरत होता. एनटीपीसीच्या एका वरिष्ठाने माहिती देताना सांगितले की, गोविंद कुमार हा यूपीएल या एजन्सीमध्ये काम करत होता. यूपीएल कंपनीचे मुख्यालय नोएडा उत्तर प्रदेश आहे. तो थेट एनटीपीसीच्या आस्थापनेवर नोकरीला नव्हता. सोलापूरच्या एनटीपीसीत अनेक कंपन्याना वेगवेगळ्या कामांचा ठेका मिळाला आहे.

युपीएल कंपनीच्या सुरक्षा अधिकाऱ्याला वैतागले होते - गोविंद कुमार या नावाच्या व्यक्तीला सीबीआयने ताब्यात घेतले आहे. तो एनटीपीसी अंतर्गत असणाऱ्या युटिलिटी पॉवरटेक लिमिटेड नावाच्या कपनीकडे सेफ्टी ऑफिसर (सुरक्षा अधिकारी) म्हणून कार्यरत होता. ही कंपनी ठेकेदार नेमणे, कंत्राट देणे आदी कामे करते. या कामांची जबाबदारी व सुरक्षा अधिकारी (सेफ्टी ऑफिसर) या पदाची जबाबदारी गोविंद कुमार याच्याकडे होती.

लाच मागत असल्याची तक्रार थेट सीबीआयला केली - गोविंद कुमार हा एनटीपीसीमधील कंत्राट देण्यासाठी, कंत्राटदारांची बिले काढण्यासाठी पैशाची मागणी करत होता. त्याच्याबाबत पैसे घेत असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. गोविंद कुमारला वैतागून एका कंत्राटदाराने थेट सीबीआयकडे तक्रार केली होती. त्यावरून शनिवारी ही कारवाई करण्यात आली.

डिपॉझिट परत देण्यासाठी मागितली लाच - एका कंत्राटदाराने एनटीपीसी अंतर्गत असलेल्या यूपीएल कंपनीकडे पाच लाख रुपये सुरक्षा ठेव (सिक्युरिटी डिपॉझिट) म्हणून ठेवले होते. ती रक्कम परत मिळवण्यासाठी त्याने कंपनीकडे रीतसर मागणी केली होती. ही रक्कम देण्यासाठी गोविंद कुमार संबंधित कंत्राटदाराकडे अडीच लाख रुपयांची मागणी करत होता. सुरुवातीला कंत्राटदाराने गोविंद कुमारला अडीच लाख रुपये देण्याचे मान्य केले होते.

एक लाख रुपये घेताना सीबीआयची कारवाई - गोविंद कुमार यास अडीच लाख रुपये देण्याची संबंधित कंत्राटदाराची इच्छा नव्हती. म्हणून त्याने पुण्यातील सीबीआयचे कार्यालय गाठले. त्या ठिकाणी रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर शनिवारी एनटीपीसी परिसरात सापळा लावण्यात आला. एनटीपीसीमध्ये असलेल्या आयटीआयच्या बाहेर संबंधित कंत्राटदाराला त्याने पैसे घेऊन येण्यास सांगितले होते. त्यानुसार शनिवारी दुपारी दीड वाजता गोविंद कुमार आयटीआयपासून बाहेर रस्त्यावर आला. त्या ठिकाणी एक लाख रुपयांची रोकड स्वीकारताना सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडून त्याला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत सीबीआयने त्याची चौकशी केली आणि जेलरोड पोलीस ठाणे येथील कोठडीत त्याची रवानगी केली.

हेही वाचा - Gram Panchayat Election Results : सोलापुरात भाजपला जबर धक्का; चिंचपूरमध्ये उद्धव ठाकरेंचा बोलबाला तर, मनगोळीमध्ये राष्ट्रवादी

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.