ETV Bharat / city

अजित पवार ४८ तासांसाठी 'दुल्हे' झाले होते - असदुद्दीन ओवेसींचा राष्ट्रवादीवर निशाणा

शिवसेना धर्मनिरपेक्ष आहे का, राहुल गांधी-शरद पवारांनी उत्तर द्यावे असे सोलापुरातील सभेत बोलताना असदुद्दीन ओवेसी ( Asaduddin Owaisi ) म्हणाले. तर अजित पवार ( Ajit Pawar ) हे दोन वर्षापूर्वी ४८ तासांसाठी 'दुल्हे' झाले होते, एखाद्या मुस्लीम नेत्याने जर असे केले असते तर त्यांना पक्षातून बाहेर काढले असते. त्यांच्यामागे पोलीस आणि शासकीय यंत्रणांना लावले गेले असते, असा टोला लगावत ओवेसींनी सोलापूर येथील एमआयएमच्या कार्यक्रमात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ( Asaduddin owaisi attack on shiv sena, NCP and congress )

Asaduddin owaisi attack on shiv sena
असदुद्दीन ओवेसींचा राष्ट्रवादीवर निशाणा
author img

By

Published : Nov 23, 2021, 2:26 PM IST

Updated : Nov 23, 2021, 7:24 PM IST

सोलापूर - शिवसेना धर्मनिरपेक्ष आहे का, राहुल गांधी-शरद पवारांनी उत्तर द्यावे असे सोलापुरातील सभेत बोलताना असदुद्दीन ओवेसी ( Asaduddin Owaisi ) म्हणाले. तर अजित पवार हे दोन वर्षापूर्वी ४८ तासांसाठी 'दुल्हे' झाले होते, एखाद्या मुस्लिम नेत्याने जर असे केले असते तर त्यांना पक्षातून बाहेर काढले असते. त्यांच्यामागे पोलीस आणि शासकीय यंत्रणांना लावले गेले असते. सोलापूर येथील एमआयएमच्या कार्यक्रमात ओवेसींचा शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तसेच ते यावेळी म्हणाले की, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाराष्ट्रात सेक्युलिरझमला 'दफन' केले अशी टीकाही असदुद्दीन ओवेसींनी केली.

असदुद्दीन ओवेसींचे भाषण

सेक्युलर म्हणून मिरवणाऱ्यांनी शिवसेनेसोबत केली आघाडी -

ऑल इंडिया मजलिस ए इतिहादुल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएम पक्षाचा मेळावा सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी, खासदार इम्तियाज जलील, फारूक शाब्दी आदी नेते उपस्थित होते. यावेळी खासदार ओवेसी यांनी महाविकास आघाडी सरकार आणि अजित पवार यांवर सडकून टीका केली. सेक्युलर म्हणणारे जनतेची फसवणूक करत आहेत. जातीच्या आधारवर असलेल्या शिवसेनेसोबत यांनी सरकार स्थापन केली.व तसेच अजित पवार यांनी भाजप सोबत पहाटेचा शपथविधी उरकून टाकला होता.अजित पवार यांनी राष्ट्रवादीला घेऊन भाजप सोबत 48 तासांचे लग्न करून घेतले होते.असा घणाघात करत खासदार ओवेसींनी मुस्लिम आरक्षणावरदेखील प्रश्न असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केला.

मुस्लिम समाजाला आरक्षणाची गरज -

खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिम समाजाला आरक्षणाची गरज आहे. याबाबत सच्चर समिती, महमूद उर राहिमान कमिटीने देखील तसा अहवाल दिला आहे. तरीही मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत कोणीही चर्चा करत नाही. मराठा समाजापेक्षा मुस्लिम समाज आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे. असे सांगत खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी कागदोपत्री माहिती उपस्थित जनसमुदायाला सांगितली. एमआयएम पक्षातर्फे याबाबत मोठे जनआंदोलन उभारून मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी लढणार असल्याचे असदुद्दीन ओवेसींनी जाहिर केले.

शिवसेना ही सेक्युलर पार्टी नाही - असदुद्दीन ओवेसी

2014साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने एकत्रित येत सत्ता स्थापन करून महाराष्ट्र राज्यात 5 वर्ष राज्य सरकार चालवली. आणि 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजप सोबत निवडणूक लढवली. सरकार स्थापन करताना मात्र शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत एकत्र येत राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. शिवसेना ही पार्टी सेक्युलर पार्टी नसून ती एक कम्युनल पार्टी आहे अशी खरमरीत टीकाही असदुद्दीन ओवेसींनी केली.

हेही वाचा - संबित पात्रांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

Last Updated : Nov 23, 2021, 7:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.