ETV Bharat / city

Omicron In Solapur : सोलापूरकरांची चिंता वाढली.. ओमायक्रॉनचा शहरात शिरकाव.. पहिला रुग्ण आढळला

कोरोनामुळे सर्वत्र परिस्थिती बिघडत चालली असताना आता सोलापूरकरांची चिंता वाढली आहे. सोलापूर शहरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हॅरिएंटने एंट्री केली ( Omicron In Solapur ) असून, एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह ( Omicron First Patient Positive Solapur ) आला आहे.

ओमायक्रॉन
ओमायक्रॉन
author img

By

Published : Jan 12, 2022, 12:55 AM IST

सोलापूर- कर्नाटक, गुजरातनंतर आता महाराष्ट्रातही ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागले ( Omicron In Maharastra ) आहेत. सोलापूर महानगरपालिका ( Solapur Municipal Corporation ) क्षेत्रात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण ( Omicron First Patient Positive Solapur ) आढळला ( Omicron In Solapur ) आहे. परंतु सोलापूर महानगरपालिका आरोग्य प्रशासनाने याबाबत कोणत्याही प्रकारचा बाऊ न करता, गुप्तता बाळगत रुग्णाची माहिती बाहेर पडू दिली नाही. त्यावर खासगी रुग्णालयात उपचार करून, मग माहिती दिली आहे. तसेच हा रुग्ण आता ठणठणीत असून, नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन शहर आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.

सोलापूरकरांची चिंता वाढली.. ओमायक्रॉनचा जिल्ह्यात शिरकाव.. पहिला रुग्ण आढळला

२७ डिसेंबरलाच अहवाल पॉझिटिव्ह

२७ डिसेंबरला ओमायक्रॉन विषाणूची लागण त्या रुग्णाला झाली होती. सोलापूर महानगरपालिका आरोग्य प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २७ डिसेंबर रोजी संबंधित रुग्णाचा ओमायक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला होता. शहर आरोग्य प्रशासनाने त्यावर ताबडतोब खासगी रुग्णालयात उपचार सुरू केले. रुग्णावर सर्व मेडिकल टीमला सोबत घेऊन उपचार केले. त्याची तब्येत ठणठणीत झाल्यावर त्याला ओमायक्रॉन असल्याबाबत माध्यमांना माहिती दिली.

संपर्कातील व्यक्तींचे टेस्टिंग सुरु

या रुग्णाच्या संपर्कातील सर्वांचे टेस्टिंग सुरू करण्यात आले आहे. संबंधित रुग्ण कोठून आला होता याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. त्याच्या संपर्कातील सर्वांचे टेस्टिंग सुरू आहे. लवकरच विस्तृत माहिती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.