ETV Bharat / city

Indian Independence Day : 1942 च्या राष्ट्रीय क्रांती आंदोलनात सोलापूरकर स्वातंत्रसैनिकांचे योगदान

ब्रिटिशांनी 13 मे 1930 रोजी आपल्या दीडशे वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मार्शल लॉ पुकारला ( British Called Martial Law ) आणि सोलापूर पुन्हा ( Solapur was known as Sholapur ) ब्रिटिशांच्या ताब्यात गेले. 8 ऑगस्ट 1942 च्या मध्यरात्रीपासून ( Mahatma Gandhi Gave Slogan ) देशभरात महात्मा गांधींनी ब्रिटिशांना "चले जाव"चा नारा दिला आणि "करो या मरो"चा नारा ( Karo Ya Maro Slogan ) दिला. याचे पडसात सोलापुरातदेखील उमटले होते. 9 ऑगस्ट 1942 ला सोलापुरात सभा, निदर्शने, आंदोलने झाली. स्वदेशी वस्तूंच्या वापराचे आवाहन करण्यात आले. ( Professor Dr. Srikant Yelegaonkar )

Amrit Mahotsav of Independent
भारतीय स्वातंत्र्य दिन
author img

By

Published : Aug 9, 2022, 11:38 AM IST

Updated : Aug 9, 2022, 2:12 PM IST

सोलापूर : सोलापूर हे स्वातंत्र्यपूर्व काळात शोलापूर म्हणून ( Solapur was known as Sholapur ) ओळखले जात होते. कारण भारत स्वतंत्र होण्याअगोदर सोलापूरकरांनी 1930 साली चार दिवस स्वातंत्र्याचा आनंद अनुभवला होता. शोलापूरकरांनी इंग्रजांना सोलापुरातून हाकलून लावले होते. 9 मे 1930 ते 12 मे 1930 असे चार दिवस एक ही ब्रिटिश सोलापुरात नव्हते.

ब्रिटिशांच्या दीडशे वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मार्शल लाॅ : 13 मे 1930 रोजी ब्रिटिशांनी आपल्या दीडशे वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मार्शल लॉ पुकारला आणि सोलापूर पुन्हा ब्रिटिशांच्या ताब्यात गेले.8 ऑगस्ट 1942 च्या मध्यरात्रीपासून देशभरात महात्मा गांधींनी ब्रिटिशांना ( Mahatma Gandhi Gave Slogan ) "चले जाव"चा नारा दिला आणि "करो या मरो"चा ( Karo Ya Maro Slogan ) नारा दिला. याचे पडसात सोलापुरातदेखील उमटले होते. 9 ऑगस्ट 1942ला सोलापुरात सभा, निदर्शने, आंदोलने झाली. स्वदेशी वस्तूंच्या वापराचे आवाहन करण्यात आले.

इंग्रजांनी अनेकांना टाकले तुरुंगात : यावेळी सोलापुरातील ब्रिटीश पोलिसांनी लाठ्या-काठ्याचा वापर करून विरोध करणाऱ्यांना तुरुंगात डांबले. अनेक तरुण, स्वातंत्र्य सैनिकांना इंग्रजांनी तुरुंगात डांबून टाकले. त्यावेळी स्त्रियांसहित सर्व जण या लढ्यात उतरले होते. याबाबत स्वातंत्र्य लढ्याची अधिक माहिती प्राध्यापक डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी ई-टीव्ही भारतशी बोलताना दिली.

1857 नंतरचा मोठा उठाव 9 ऑगस्ट 1942 रोजी : भारतीय इतिहासात 1857 साली भारतीय स्वातंत्र्याचा मोठा उठाव झाला होता. यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. 1900 ते 1920 पर्यंत टिळक युग होते. लोकमान्य टिळकांच्या मार्गदर्शनाखाली भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक आंदोलने, निदर्शने झाली होती. 1920 नंतर अहिंसावादी गांधी युग सुरू झाले.

महात्मा गांधींच्या आवाहनाला सोलापुरात मोठा प्रतिसाद : सत्याग्रह, प्रामाणिकमार्गाने इंग्रजांकडून भारतप्राप्तीसाठी प्रयत्न सुरू झाले. व्यापक स्वरूपात आंदोलनाला खरी सुरुवात असहकार आंदोलनापासून सुरुवात झाली. 1920 नंतर देशव्यापी आंदोलने होऊ लागली. 1857 साली भारतात मोठा उठाव झाला होता. त्यानंत इंग्रजांविरोधात महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 9 ऑगस्ट 1942 रोजी "चले जाव"चा नारा दिला. या आंदोलनात महात्मा गांधी यांनी यांनी "करो या मरो"चा नारा देण्यात आला. "चले जाव"आंदोलनाची दाहकता सोलापुरातदेखील झाली असल्याची माहिती येथील इतिहास तज्ज्ञ पुराव्यानिशी देतात.

1942 ला सोलापुरात विविध ठिकाणी जाळपोळ : दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्रज हे भारत सोडून जातील, असे इंग्रजांनी सांगितले होते. मात्र, ऐनवेळी तूर्ततरी भारत देशाला सोडून जाता येणार नाही असे घोषित झाल्याबरोबर महात्मा गांधी यांनी 8 ऑगस्ट रोजी रात्री "चले जाव" असा नारा दिला. 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या क्रांती मैदानावर मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, इंग्रजांनी रात्रभर अटक सत्र करीत स्वातंत्र्य चळवळीतील मोठ मोठ्या नेत्यांना अटक केले होते. सोलापुरातदेखील याचे पडसाद उमटले होते. येथील नेत्यांनी, तरुणांनी पोस्ट ऑफिस, रेल्वे स्टेशन, इंग्रज सरकारचे कोर्ट पेटवून दिले होते.

1942 च्या क्रांती लढ्यात सोलापूरकरांनी सहभाग घेतला होता : महात्मा गांधी यांच्या आवाहनाला सोलापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. इंग्रजांना पिटाळून लावण्यासाठी सोलापुरातील विविध गांधीवादी नेत्यांनी 9 ऑगस्ट 1942च्या क्रांती लढ्यात सहभाग नोंदविला होता. यामध्ये डॉ. भाऊ काका अंत्रोळीकर, तुळशीदास जाधव, भाई छंनुसिंह चंदेले, रामकृष्ण जाजू, विभूते यांसह आदी नेत्यांनी व महिलांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. भारतीय स्वतंत्र लढ्याच्या इतिहासात सोलापूरकरांनी मोलाचे योगदान दिले आहे, त्याची नोंद राष्ट्रीय पातळीवर झाली पाहिजे, असे अनेक इतिहासकारांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : On Occasion World Tribal Day : आदिवासी दिनीच 'या' आदिवासी पाड्यातील नागरी सुविधांचे भयाण वास्तव समोर....

Last Updated : Aug 9, 2022, 2:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.