सोलापूर - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा राज्यभर उग्र आंदोलन करणार असल्याची माहिती सोमवारी (दि. 7 जून) मराठा क्रांती मोर्चाच्या सोलापुरातील समन्वयकांनी दिली. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चा वतीने सोलापुरातील अण्णासाहेब मंगल कार्यालयात बैठक झाली. यावेळी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याबाबत चर्चा झाली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. 16 जूननंतर सोलापुरातही मराठा आरक्षणासाठी उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याची माहिती देण्यात आली.
कोल्हापूरनंतर सोलापुरात मराठा समाजाचे आंदोलन
खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार उदयनराजे भोसले आणि भाजप नेते नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार कोल्हापूरनंतर सोलापुरात मराठा समाजाचे उग्र आंदोलन होणार आहे. मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावे या मागणीसाठी 16 जूननंतर उग्र आंदोलन होणार आहे.
रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास निराळे वस्ती येथील अण्णासाहेब मंगल कार्यालयात मराठा क्रांती मोर्चाची बैठक झाली. या बैठकीस प्रताप चव्हाण, अनंत जाधव, श्रीकांत घाडगे, बाळासाहेब गायकवाड, किरण पवार, राम जाधव, योगेश पवार, हेमंत पिंगळे, बाळासाहेब पुणेकर, निशांत सावळे, राजू आलूरे, जीवन यादव, संजय जाधव, राजू साळुंखे, सोमनाथ राऊत, विजय पोखरकर, महादेव कदम, महादेव वाघमारे, विवेक पाटील, ललित धवणे आदी मराठा समाजातील मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा - शिवराज्याभिषेक दिन विशेष: सोलापुरातील चंडक दाम्पत्याने जपली 400 वर्षांपूर्वीची ऐतिहासिक नाणी