ETV Bharat / city

निकालाबाबतच्या भोंगळ कारभाराविरुद्ध अभाविपचे विद्यापीठात आंदोलन; कुलगुरु दालनासमोर ठिय्या

विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांविषयी सोलापूर विद्यापीठास वेळोवेळी निवेदन दिले, परंतु विद्यापीठाकडून आतापर्यत कसलेही सकारात्मक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आज बुधवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आंदोलन करण्यात आले आहे.

abvp
निकालाबाबतच्या भोंगळ कारभाराविरुद्ध अभाविपचे विद्यापीठात आंदोलन
author img

By

Published : Dec 16, 2020, 9:03 PM IST

सोलापूर - विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांविषयी सोलापूर विद्यापीठास वेळोवेळी निवेदन दिले, परंतु विद्यापीठाकडून आतापर्यत कसलेही सकारात्मक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आज बुधवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कुलगुरुंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांचे मार्च/एप्रिल २०२० मध्ये फॉर्म भरायचे राहिले होते अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म ऑक्टोबर २०२० मध्ये अतिविलंब शुल्कासह नोव्हेंबर २०२० मध्ये परीक्षा घेऊ या आश्वासनावर भरून घेतले होते. परंतु डिसेंबर अर्धा संपला अजूनही या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियोजन विद्यापीठाकडे नाही. त्या विद्यार्थ्यांचे अतिविलंब शुल्क परत करावे ही अभाविपची मागणी होती.

दिनेश मठपती - कार्यालय मंत्री, अभाविप सोलापूर

परीक्षा निकालाबाबत संभ्रम-

नुकतेच सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेचे निकाल लागले आहे. ज्यात अनेक विद्यार्थ्यांना समस्या आल्या आहेत. निकाल राखीव असणे, अनुउपस्थिती दर्शवणे व अनेकांनी चांगले पेपर देऊन देखील नापास झाल्याच्या तक्रारी अभाविपकडे आल्या आहेत. त्याविषयी विद्यापीठ प्रशासनाशी चर्चा करून देखील त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.

abvp
निकालाबाबतच्या भोंगळ कारभाराविरुद्ध अभाविपचे विद्यापीठात आंदोलन

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा उल्लंघन-

विद्यार्थ्यांना छायांकित प्रत मिळावी ही मागणी विद्यापीठाकडे केली आहे. ज्यावर 7 डिसेंम्बर 2020 रोजीच्या परिपत्रकात पुनर्मुल्याकन व छायांकित प्रत सुविधा देता येणार नाही असे विद्यापीठाने नमूद केले आहे. परंतु सुप्रीम कोर्टाच्या आदेशाद्वारे (२००७) विद्यापीठाला छायांकित प्रत उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे व ती उपलब्ध त्यांनी करून द्यावी. सोलापूर विद्यापीठ प्रशासन सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याची माहिती अभाविपने यावेळी बोलताना दिली.

विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या

विद्यार्थी समस्या सांगण्यासाठी परीक्षा नियंत्रकांना फोन केले असता एक पण फोन लागत नाही व विद्यार्थी गेट वर आले असता त्याला आत सोडले जात नाही. अश्या अनेक समस्यांचे निवारण करण्यासाठी व विद्यार्थी हिताच्या रास्त मागण्या वारंवार विद्यापीठाकडे निवदनाद्वारे केल्या होत्या, परंतु विद्यापीठ प्रशासनाने याची योग्य ती दखल न घेतल्यामुळे अभाविप विद्यार्थी हिताच्या मागण्यांसाठी जोरदार आंदोलन केले.

आंदोलन होताच विद्यापीठ प्रशासनाची सारवासारव-

फोटोकॉपी च्या मागणीसाठी शेवटी विद्यापीठ प्रशासनाकडून येत्या 21 तारखेला याबाबतीत निर्णय घेऊ व तोपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही असे आश्वासन दिल्यामुळे अभाविपने हे आंदोलन मागे घेतले. जर तसा निर्णय झाला नाही तर विद्यार्थ्यांच्या हितासाठी याहीपेक्षा तीव्र आंदोलन अभाविप करेल. हे आंदोलन होताच विद्यापीठ प्रशासन सारवासारव करताना दिसून आले.

आंदोलनात उपस्थिती-

यावेळी महानगर मंत्री अनिकेत प्रधाने, पंढरपूर तालुका प्रमुख आनंद भुसनर, जिल्हा संयोजक प्रणव बडगंडी, सोलापूर जिल्हा सह-संयोजक रेवती मुदलियार, सृष्टी डांगरेसह आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.