ETV Bharat / city

ujani dam water : कुंकवाच्या पाण्याने केला पालकमत्र्यांच्या प्रतिमेचे जलाभिषेक

इंदापूर व बारामतीला पाणी नेण्याच्या निर्णयाचा निषेध करत घागरी वाजवत तसेच पालकमंत्र्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुंकू मिश्रित पाण्याने जलाभिषेक करण्यात आला. दिवसेंदिवस सोलापुरात उजनी पाण्याचा प्रश्न पेटत चालला आहे. सर्व पक्ष स्तरावरून विद्यमान पालकमंत्री दत्तात्रय भरणे ( Guardian Minister Dattatray Bharne ) यांचा विरोध वाढतच आहे. आम आदमी पक्षाच्या वतीनेही सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घागरी वाजवून आणि कुंकूने जलाभिषेक करत निषेध करण्यात आला.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : May 18, 2022, 8:32 PM IST

सोलापूर - इंदापूर व बारामतीला पाणी नेण्याच्या निर्णयाचा निषेध करत घागरी वाजवत तसेच पालकमंत्र्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुंकू मिश्रित पाण्याने जलाभिषेक करण्यात आला. दिवसेंदिवस सोलापुरात उजनी पाण्याचा प्रश्न पेटत चालला आहे. सर्व पक्ष स्तरावरून विद्यमान पालकमंत्री दत्तात्रय भरणे ( Guardian Minister Dattatray Bharne ) यांचा विरोध वाढतच आहे. आम आदमी पक्षाच्या वतीनेही सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घागरी वाजवून आणि कुंकूने जलाभिषेक करत निषेध करण्यात आला.

सोलापूरचा पाणीपुरवठा सुरळीत करा मग देशभर वाटप करा - आम आदमी पक्षाचे पदाधीकारी म्हणाले, सोलापूरचा पाणी प्रश्न गंभीर असतानाही याचा विचार न करता लिंबोळी लाकडी योजना मंजूर करून उजनी जलाशयातील पाणी इंदापूर, बारामती (जि. पुणे) येथील ग्रामीण भागात वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधी सोलापूरला दररोज पिण्याचा पाणी पुरवा त्यानंतर देशभर कुठेही पाणी न्या, असे मत व्यक्त केले.

आम आदमी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते - यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री ऍड. सागर पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष खतीब वकील, जिल्हा उपाध्यक्ष अतिश गायकवाड, जिल्हा संघटक आनंद जाधव, शहर उपाध्यक्ष जैनोद्दीन शेख, अशोक होटकर, मल्लिकार्जुन पिलगेरी, मदणी जफर, निलेश संगेपाग,अजय जाधव, विनायक पवार, सचिन व्हनमाने आदी उपस्थित होते.

हेही वाचा - ...तर आम्ही रान पेटवू, आमदार प्रणिती शिंदे यांचा पालकमत्र्यांना इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.