ETV Bharat / city

कुर्डूवाडीत हिंदू तरुणाने निराधार ख्रिश्चन महिलेवर केले ख्रिश्चन पद्धतीने अंत्यसंस्कार - कुर्डुवाडी कोरोनाबाधित महिला अंत्यसंस्कार बातमी

कोरोनाचा झपाट्याने वाढत असलेला संसर्ग, ऑक्सिजन, बेड आणी रेमडेसिवीर इंजेक्शनचा निर्माण झालेला तुटवडा यामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत कोविड केअर सेंटरसह रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी, स्मशानभूमीत अत्यसंस्कार करणारे सेवक हे कोरोना योध्दे म्हणून अहोरात्र काम करत आहेत. आपल्या माणसाचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या जवळ देखील नातेवाईक जात नाहीत. अशा परिस्थितीत कुर्डूवाडीच्या जितेंद्र गायकवाड या तरुणाने माणुसकी दाखवली.

corona patient funeral news
corona patient funeral news
author img

By

Published : Apr 22, 2021, 12:58 PM IST

Updated : Apr 23, 2021, 1:30 PM IST

सोलापूर - कोरोनाने मृत्यू झालेल्या एका ५९ वर्षीय वृध्द महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नात्यातील कोणीही आले नाही. अशा परिस्थितीत एका तरूणाने त्या महिलेवर अंत्यसंस्कार केले. ही घटना माढा तालुक्यातील कुर्डूवाडी शहरात घडली. कुर्डूवाडीतील रेल्वे कॉलनीत अनेक दिवसांपासून वास्तव्यास असलेल्या ५९ वर्षीय निराधार वृद्धेचा कोरोनावर उपचार घेत असताना मृत्यू झाला. जितेंद्र युवराज गायकवाड या तरुणाने पुढाकार घेऊन त्यांच्यावर अत्यसंस्कार केले. जितेंद्रला डेव्हिड नावाच्या तरुणाने देखील मदत केली.

59वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. उपचार घेत असताना त्याचे नातेवाईक त्यांना एकदाही पाहण्यासाठी आले नाहीत. उपचार घेत असताना १९ एप्रिलला दुपारी १ वाजता त्यांचा मृत्यू झाला. मात्र, जवळचे नातेवाईक आले नसल्याने त्यांच्यावर अत्यसंस्कार कसा करायचा, हा प्रश्न उपस्थित झाला. याची माहिती कुर्डूवाडीकर हेल्पलाईनच्या माध्यमातून काम सामाजिक कार्य करणाऱ्या जितेंद्र गायकवाड यांना मिळाली. जितेंद्र यांनी स्वत: पीपीई किट घालुन या वृध्द महिलेचे पार्थिव पॅक करून खिश्चन धर्माच्या रीतीनुसार त्यावर अत्यंसंस्कार केले.

शहरावासियांसाठी सुरू केली हेल्पलाईन -

जितेंद्र गायकवाड हा तरुण कुर्डूवाडीमधील रहिवासी आहे. त्याने "हाक तुमची साथ आमची, आम्ही कुर्डूवाडीकर आपल्या मदतीस चालु" या हेल्प लाइनच्या माध्यमातून जितेंद्रने अनेकांना मदत केली आहे. रुग्णवाहिकेसह अन्य अडचणींसाठी - 8600698799 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्याने केले आहे.

अनेक महिन्यांपासून या वृध्द आजी रेल्वे कॉलनीत वास्तव्यास होत्या. कोरोनाबाधित असताना त्यांचा मृत झाल्याने त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. ही घटना समजताच मी पीपीई किट घालून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. मी याला माझी बांधिलकी आणि कर्तव्य समजतो. यापुढे ही कोरोना काळात याच उत्साहाने काम सुरु राहील, असे जितेंद्र म्हणाला.

सर्वाधिक वाचल्या गेलेल्या बातम्या

निवृत्त पोलिसासोबत झालेल्या झटापटीत सराईत गुन्हेगाराचा मृत्यू, बघा थरारक VIDEO

लॉजमधील हाय-प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, ८ तरुणींसह १० जणांना अटक

नवी मुंबईत दोन भाऊ, बहिणीसह तिघांवर कोयत्याने हल्ला, छेड काढल्याची तक्रार केल्याने केला हल्ला

Maharashtralockdown : राज्यात कडक निर्बंध लागू, अशी आहे नवीन नियमावली

गोव्यात नाईट कर्फ्यू लागू, अशी आहे नवीन नियमावली

आता ५० वर्षावरील पोलीसांना "नो फील्ड,ओन्ली ऑफिस ड्युटी" - गृहराज्यमंत्री

कुर्डूवाडीत हिंदू तरुणाने निराधार ख्रिश्चन महिलेवर केले ख्रिश्चन पद्धतीने अंत्यसंस्कार

Last Updated : Apr 23, 2021, 1:30 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.