ETV Bharat / city

Parsi Community New Year 2022 पारशी समाजाच्या अंतिम घटका सोलापुरात बोटावर मोजण्याइतकी लोकसंख्या

पारशी समाज Parsi Community प्रत्येक वर्षी 15 ऑगस्ट रोजी पतेती सण पारशी समाजाकडून अग्नी देवतेसमोर God of Fire माफी मागून साजरा केला जातो दुसऱ्या दिवशी 16 ऑगस्ट रोजी नववर्ष साजरा Nowruz केले जाते भारत देशातील पारशी लोकसंख्या घटत असल्यामुळे ती एक चिंतेची बाब ठरली आहे केंद्र सरकारने नोव्हेंबर 2013 साली जियो पारशी योजना आणली पारशी सामुदायात जास्तीत जास्त मुले बाळं जन्माला यावे यासाठी ही योजना आहे

Parsi Community
पारशी समाजाच्या नूतन वर्षाला
author img

By

Published : Aug 16, 2022, 7:38 AM IST

Updated : Aug 16, 2022, 10:53 AM IST

सोलापूर पारशी झोरोस्ट्रीयन Zoroastrian समाज Parsi Community पतेती हा दिवस क्षमा पश्चाताप म्हणून साजरा करतात. दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी पतेती सण Pateti Festival पारशी समाजाकडून Parsi Community अग्नी देवतेसमोर God of Fire माफी मागून साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी 16 ऑगस्ट रोजी नववर्ष साजरा केले जाते. याला नवरोझ Nowruz असेही म्हटले जाते. पतेतीला पश्चाताप करीत आपल्या सर्व पापांबद्दल अग्नी देवतेसमोर माफी मागितली जाते. पतेतीला पारशी समाजातील लोकं त्यांच्या चुका वाईट गोष्टींबाबत क्षमा मागतात आणि दुसऱ्या दिवसापासून नवी सुरुवात करतात. सोलापुरातदेखील जेमतेम लोकसंख्या असलेल्या पारशी समुदायातील लोक पतेती व नवरोज साजरा करीत आहे.

पारशी समाजाचा घेतलेला आढावा

पारशी लोकसंख्या वाढविण्यासाठी जियो पारशी योजना भारत देशातील पारशी लोकसंख्या घटत असल्यामुळे केंद्र सरकारने नोव्हेंबर 2013 साली जिओ पारशी योजना आणली. सोलापुरातससुद्धा पारशी समुदायाची लोकसंख्या बोटावर मोजण्याइतकी राहिली आहे. आजदेखील पारशी समुदायातील लोकसंख्या घटतच चालली आहे. पारशी समुदायात जास्तीत जास्त मुले बाळे जन्माला यावे यासाठी ही योजना आहे. या योजनेनुसार 2013 पासून आजतागायत पारशी समाजात फक्त 359 बाळांचा जन्म झाला आहे. 2014 मध्ये 16 बाळ जन्माला आले. 2015 साली 38 बाळ जन्मले 2016 मध्ये 28 बाळ जन्माला आले 2018 मध्ये 38, 2019 मध्ये 59 आणि 2020 मध्ये 61 बाळ जन्माला आले.

सोलापुरात शंभरहून कमी पारशी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात शंभरहून कमी पारशी असल्याची माहिती पुजारी विष्टाष्प मुंशी यांनी दिली. सोलापूर शहरातील लष्कर या भागात पारशी सामुदायाचे अग्यार (मंदिर) आहे. हे मंदिर 1844 मध्ये ब्रिटिश काळी स्थापन झाले आहे. पारशी अंजुमन या संस्थेमार्फत या मंदिराची देखभाल केली जाते. शहरात शंभरहून कमी लोकसंख्या असल्याची माहिती यावेळी दिली. झरीन अमरिया झुबिन अमरिया फरीज दारुखनावला बेहराम इरानी मोनाज पेठावाला अनहिता लाल हे अग्यारी मंदिराचे सांभाळ करीत आहेत. सोलापुरातील अग्यारी मंदिराचे पुजारी त्यांचे वय जवळपास 120 वर्षे आहे. तेदेखील अद्याप अविवाहित आहेत. त्यांचे बंधू 150 वय असताना निधन झाले. तेदेखील अविवाहित होते. पारशी समाजात मुली नसल्याने लग्न करणे अवघड झाले आहे असेही यावेळी विष्टाष्प मुंशी म्हणाले.

कित्येक दशकापासून लोकसंख्या घटत आहे गेल्या कित्येक वर्षांपासून पारशी समुदायाची लोकसंख्या घटत चालली आहे. यामध्ये प्रमुख कारण म्हणजे अविवाहित राहणे उशिरा लग्न करणे समुदायाच्या बाहेरील मुलीसोबत लग्न न करणे अशा अनेक कारणांमुळे 1941 पासून पारशी समुदाय कमी होत चालला आहे. 2001 च्या जनगणनेनुसार भारतात पारशी लोकसंख्या 69 हजार 601 होती. 2011च्या लोकसंख्येनुसार 57 हजार 264 इतके पारशी भारतात उपलब्ध आहेत.

दिवाळी सणाप्रमाणे पारसी समाज नववर्ष पतेती साजरे करतो आपल्याकडे जशी दिवाळी उत्साहात साजरी केली जाते. त्याच प्रमाणात पारशी धर्मात पतेतीचं महत्त्व आहे. या दिवशी सगळे पारशी कुटुंबं नवीन कपड्यांची खरेदी करतात. घरात गोडधोड पदार्थांची मेजवानी असते. मित्र-नातेवाईक यांना आमंत्रित करून त्यांच्यासोबत या पक्वान्नांचा आस्वाद घेतला जातो. त्यात गोड खीर रव्याचा शिरा दह्यापासून बनवले जाणारे गोड पदार्थ अशी रेलचेल प्रत्येक घरात असते. दिवाळीत आपण जसे एकमेकांना मिठाई देतो तसेच पारशी लोक एकमेकांना आणि इतर धर्मातील मित्रांनाही मिठाई वाटून सणाचा आनंद साजरा करतात.

मुंबईत सर्वाधिक लोकसंख्या १९ व्या शतकाच्या प्रारंभी जेव्हा पारशी लोक मुंबईत आले तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होते. नंतर हळूहळू आपल्या खाद्यसंस्कृतीने त्यांनी या शहराला भुरळ घातली. मुंबईसह देशातील अनेक शहरांत पारशी हॉटेल्सची लोकप्रियता प्रचंड आहे. मुंबईतील नाक्यानाक्यांवर इमारतींच्या कोपऱ्याच्या गाळ्यांत ही पारशी हॉटेल्स गेल्या १०० वर्षांहून अधिक काळ स्वतःचे एक वेगळेपण जपत आहेत. या पारशी हॉटेल्सना इराणी हॉटेल्स किंवा इराणी कॅफेज असेही म्हणतात. असे हे पारसी लोकं देशाचा एक भाग आहेत.

हेही वाचा Independence Day एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकरांच्या पराक्रमामुळेचं भारताचा चीनवर वचक

Last Updated : Aug 16, 2022, 10:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.