ETV Bharat / city

Cycle Day Special : भंगारातील सायकलींना आधुनिक रुपडं देणारा अवलिया; दिव्यांगासाठी बनवतो विशेष सायकली - Hand sanitizer machine

सोलापुरातील सायकली रिपेअर करणाऱ्या फारूक सय्यद यांनी गेल्या चाळीस वर्षांपासून सायकलला आधुनिक रूप देण्यातच आपले आयुष्य घालवले आहे. विशेष करून दिव्यांग नागरिकांसाठी त्यांनी विशेष सायकली तयार केल्या आहेत. अनेक सायकल कंपन्यांना जे जमलं नाही ते सोलापुरातील सायकल मेकॅनिक फारूक सय्यद ( Cycle mechanic Farooq Syed ) यांनी करून दाखवल आहे. त्याबद्दल आपण सायकल दिना निमित्त जाणून घेणार आहोत.

Cycle Day Special
Cycle Day Special
author img

By

Published : Jun 3, 2022, 11:31 AM IST

सोलापूर: दुचाकी आणि चारचाकी वाहनांना आधुनिक रूप किंवा त्याचे नूतनीकरण करण्याकडे अधिक कल वाढू लागला आहे. मात्र सोलापुरातील सायकली रिपेअर करणाऱ्या फारूक सय्यद यांनी गेल्या चाळीस वर्षांपासून सायकलला आधुनिक रूप देण्यातच आपले आयुष्य घालवले आहे. विशेष करून दिव्यांग नागरिकांसाठी त्यांनी विशेष सायकली तयार केल्या ( special bicycle for the disabled ) आहेत. अनेक सायकल कंपन्यांना जे जमलं नाही ते सोलापुरातील सायकल मेकॅनिक फारूक सय्यद ( Cycle mechanic Farooq Syed ) यांनी करून दाखवल आहे. सायकल वापरण्याने आरोग्य फिट राहते याची देखील जाणीव ठेवून आरोग्य दायक किंवा आरोग्यास लाभदायक सायकली तयार केल्या आहेत. भंगारातील जुन्या सायकलींना आधुनिक रूप ( Modern look to old scrap bicycles ) देत त्यांनी ही किमया केली आहे. आजूबाजूला असलेल्या दोन ते तीन जिल्ह्यातील नागरिक देखील याचा लाभ घेत आहेत. बिगर दिव्यांग आणि दिव्यांग या दोन्ही प्रकारच्या नागरिकांना याचा लाभ होत आहे.

भंगारातील सायकलींना आधुनिक रुपडं देणारा अवलिया

अनेक कंपन्यांना जमलं नाही ते करून दाखवल -

दिव्यांग नागरिकांसाठी अनेक कंपन्यानी हाताने पायडल मारणाऱ्या सायकली बनवल्या आहेत. परंतु लकवा किंवा पॅरॅलीसमुळे ज्यांचे एक हात आणि एक पाय लुळे पडले आहेत, त्यांचे काय असा सवाल फारूक सय्यद यांना पडला होता. त्यासाठी त्यांनी भंगारातील जुनी सायकल घेत, त्याला आधुनिक रूप दिले. तसेच सीटवर बसून एक हात आणि एक पाय याद्वारे चालवता येणारी सायकल तयार ( A special bicycle for the disabled ) केली. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग करून कमी ताकदीत पायडल मारता यावे, त्यासाठी दोन चैन बसविली आणि एका हाताने आणि एका पायाने लुळे असणाऱ्यासाठी दिव्यांग सायकल तयार केली.

आरोग्यासाठी संपूर्ण शरीराचे व्यायाम व्हावे यासाठी सायकल-

दिव्यांगासाठी बनवलेली सायकल
दिव्यांगासाठी बनवलेली सायकल

पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांमुळे आजकाल फक्त वाहनांचा वापर वाढला आहे. यामुळे नागरिकांचे चालणे किंवा सायकल वापरणे बंद झाल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे शरीराला योग्य व्यायाम न मिळाल्याने नागरिक अनेक रोगांनी ग्रस्त झाले आहेत. अनेक वैद्यकीय तज्ञ सायकल वापरा किंवा वाकिंगचे (चालणे) सल्ले देतात. त्याला अनुसरून सोलापुरातील गुरुनानक चौक येथील सायकल मेकॅनिक फारूक सय्यद यांनी आरोग्यासाठी उपायकारक व लाभदायक अशी सायकल निर्माण केली. सायकलचे पायडल मारता मारता, हाताने हॅन्डवेलच्या माध्यमातून पायडल मारून सायकल चालवता येते. आपल्या संपूर्ण शरीराचे व्यायाम होईल, अशी सायकल निर्माण केली. ही सायकल पूर्णपणे जुन्या सायकली पासून निर्माण केली असून एका ग्राहकास दिली आहे. तो ग्राहक त्या सायकलीचा लाभ घेत आहे.

सायकलच्या ब्रेक पासून सॅनिटायझर हॅन्ड मशीन तयार केली -

कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर सॅनिटायझर आणि मास्कला अनन्यसाधारण महत्व आले होते. अनेक फॅब्रिकेशन कारखान्याच्या मालकांनी किंवा अनेक कंपन्यानी पायाने दाबन्याचे सॅनिटायझर मशीन आपापल्या कार्यालयात बसविले. याची किंमत जवळपास हजार ते दोन हजार रुपयांपर्यंत होती. पण फारूक सय्यद यांनी अगदी माफक दरात ही हॅन्ड मशीन तयार ( Hand sanitizer machine ) केली. सायकलीच्या जुन्या ब्रेक पासून एका साध्या प्लास्टिक बॉटल पासून ही हॅन्ड मशीन तयार केली. याची किंमत त्यांनी फक्त 250 रुपये ठेवली होती. याचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला आहे.

हेही वाचा - Solapur Crime : सोळा महिन्यांच्या बाळावर लैंगिक अत्याचार आणि हत्या; माता, पित्याला फाशी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.