पुणे - पुण्यातील कात्रज (Katraj) बोगद्याजवळ असलेल्या दरीमध्ये एका तरुणाचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत सापडला (Youth Deathbody found burnt) आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला आहे. या प्रकरणाचा भारती विद्यापीठ पोलीस (Bharati Vidyapeeth Police) पुढील तपास करत आहेत.
काय आहे प्रकरण? - या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज घाट परिसरामधील दरीमध्ये एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस आणि अग्निशमन दल हे घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांनी तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. पण तो मृतदेह पूर्णपणे जळलेल्या अवस्थेत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून हा तरुण वानवडी येथे राहत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी त्या तरुणाच्या घरच्यांशी संपर्क केला असता, हा तरुण दोन दिवसांपूर्वीच घर सोडून गेला असल्याचे त्याच्या घरच्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, हा घातपात आहे की आत्महत्या याचा तपास आता भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.