ETV Bharat / city

डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, पंधरा दिवसांनी होते लग्न - रोड अपघात पुणे

विराज प्रताप निकम ( वय २९, रा. मानव मंदिर सोसायटी धनकवडी, पुणे) या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर, त्याचा एक मित्र या अपघातात गंभीर जखमी झाला.

viraj nikam
विराज प्रताप निकम
author img

By

Published : Mar 4, 2020, 10:31 PM IST

पुणे - अवघ्या 15 दिवसांनी लग्न असलेल्या एका तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे. पुण्यातील नवले पुलाजवळ बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विराज प्रताप निकम ( वय २९, रा. मानव मंदिर सोसायटी धनकवडी, पुणे) या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर, त्याचा एक मित्र या अपघातात गंभीर जखमी झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, मृत विराज हा मित्र प्रितेशसोबत नऱ्हे येथील नवले पुलाजवळील सेवा रस्त्यावरून ऍक्टिवा गाडीवरून जात असताना डंपरच्या चाकाखाली चिरडला गेला. गंभीर जखमी झाल्याने नागरिकांनी त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर, मित्र प्रितेश प्रविण शहा ( वय २९) जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

१९ मार्च रोजी विराजचे लग्न होते. मित्रासोबतचे काम झाल्यानंतर तो आज कुटुंबीयांसोबत केळवणासाठी नातेवाईकांकडे जाणार होता. त्यामुळे घरातही सगळे त्याची वाट बघत होते. मात्र, तो प्रत्यक्ष जाण्यापूर्वीच त्याच्या मृत्यूची बातमी पोहचल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. लग्नाची तयारी पूर्ण झाली असताना प्रत्यक्ष नवरदेवाचाच करूण अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अपघात घडल्यानंतर डंपर जागेवरच सोडून चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. रात्री उशिरापर्यंत सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा -

२०१०ची प्रश्नावली पुन्हा लागू करेपर्यंत राज्यात 'एनपीआर' लागू होणार नाही; आंध्र सरकारचा निर्णय..

राहुल गांधींनी केला दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा, म्हणाले....

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.