ETV Bharat / city

Woman Beat Police in Police Station : तरुणीने चौकीतच केली पोलिसांना मारहाण, गुन्हा दाखल - शाहू कॉलनी

एका तरुणीने कर्वेनगर पोलीस चौकीत पोलिसांना शिवीगाळ करत महिला पोलिसाला मारहाण केली ( Woman Beat Police in Police Station ) . एवढ्यावर न थांबता तिने पोलीस उपनिरीक्षकासोबतही गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तरुणी व तिच्या आईच्या विरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात ( Warje Malwadi Police Station ) गुन्हा दाखल झाला आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Jan 3, 2022, 5:11 PM IST

Updated : Jan 3, 2022, 6:23 PM IST

पुणे - कर्वेनगरमधील शाहू कॉलनी या ठिकाणी एक तरुणी आणि तिची आई दगड, विटा आणि धारदार शस्त्राने वाहनांची तोडफोड करत असल्याचे माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर वारजे पोलीस ठाण्याचे बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्या दोघींना पोलिसांनी चौकशीसाठी कर्वेनगर पोलीस चौकीत नेले. त्या ठिकाणी तरुणीने महिला पोलिसाला शिवीगाळ करत झटापट केली ( Woman Beat Police in Police Station ). ही घटना रविवारी (दि. 2 जानेवारी) दुपारी घडली. या प्रकरणी त्या तरुणीविरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ( Warje Malwadi Police Station ) करण्यात आला आहे.

घटनास्थळ

याप्रकरणी महिला पोलीस कर्मचारी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मृणाल किरण पाटील ( वय 21 वर्षे ), सजणा किरण पाटील (वय 45 वर्षे) या दोघीविरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस उपनिरीक्षकावर गैरवर्तन करण्याचा प्रयत्न

ही तरुणी एवढ्यावरच थांबली नसून एका पोलीस शिपायाच्या अंगावर हल्ला चढवत शर्टाची बटणे तोडली. तसेच कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासोबतही गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस समजावून सांगत असताना तरुणी ऐकण्याच्या मनस्थीतीत नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पोलीस चौकीत तक्रारीची प्रक्रिया सुरू असताना ही तरुणी आणि महिला चौकीतून काही घडले नसल्यासारखे घरी निघून गेल्या आहेत.

हेही वाचा - Criminal Intern : पुणे पोलिसांची आणखी एका सराईत गुन्हेगाराला केले स्थानबद्ध

Last Updated : Jan 3, 2022, 6:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.