ETV Bharat / city

देशाल सक्षम करण्यासाठी तरुणाईने पुढाकार घ्यावा - जमयांग न्यामग्याल

देशाला सक्षम करण्यासाठी तरुणाईने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. देशासाठी तरुणांनी आपल्या क्षेत्रात चांगले काम करून योगदान दिले पाहीजे.

खासदा जम्यांग त्सोरिंग
author img

By

Published : Oct 10, 2019, 12:48 PM IST

पुणे - देशाला सक्षम करण्यासाठी तरुणाईने पुढाकार घेणे आवश्यक आहे. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी काय करता येईल याचा विचार तरुणांनी करावा. केवळ सोशल मीडियावर व्यक्त होऊन देश बदलणार नाही. त्यासाठी रस्त्यावर उतरून काम करावे लागेल. देशासाठी सर्वांनी राजकारणातच गेले पाहिजे असेही नाही. आपापल्या क्षेत्रात चांगले काम करूनही देशासाठी योगदान देता येते, असे मत लडाखचे खासदार जमयांग त्सेरिंग नामग्याल यांनी व्यक्त केले. 'पुणे लडाख नवे मैत्रिपर्व शुभारंभ' या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार गिरीश बापट आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

खासदार नामग्याल

देशातून गरिबी हद्दपार करण्यासाठी, प्रदूषण दूर करण्यासाठी आम्ही काय करू शकतो हा विचार तरुणाईने करणे गरजेचे आहे. अनेक तरुण राजकारणापासून स्वतःला दूर ठेवतात. राजकारणात इच्छा नसल्याचे उघड उघड सांगतात. राजकारणापासून दूर जाण्याचा तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीही ते तुमची पाठ सोडणार नाही. त्यामुळे तरुणांनी राजकारणापासून दूर पळू नये. उलट तरुणांनी घरातून बाहेर पडावे. जो पक्ष चांगला वाटेल, त्याचा प्रचार करावा पण राजकारणात यावे. राजकारण म्हणजे डर्टी गेम हा विचार डोक्यातून काढून टाकावा. एखाददुसरा व्यक्ती वाईट विचारांचा असला म्हणून संपूर्ण राजकारण वाईट होत नाही.

लडाख नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेले आहे. जेवढी नैसर्गिक संपदा लडाखमध्ये आहे तितकी देशात इतर कुठे नसेल. सोलर एनर्जीचे अनेक प्रकल्प लडाखमध्ये पाहायला मिळतील. लडाखमध्ये अनेक जातीधर्माचे लोकं एकोप्याने राहतात, अशा शांतताप्रिय लडाखला समजून घेण्यासाठी भारताच्या सर्वच राज्यातील नागरिकांनी विशेषतः तरुणांनी लडाखला भेट द्यावी.

Intro:(बाईट मोजोवर)
देशाला सक्षम करण्यासाठी तरुणाईने पुढाकार घेणे आवश्यक आहे..देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी मी काय करता येईल याचा विचार तरुणांनी करावा. केवळ सोशल मीडियावर व्यक्त होऊन देश बदलणार नाही. त्यासाठी रस्त्यावर उतरून काम करावे लागेल. देशासाठी सर्वांनी राजकारणातच गेले पाहिजे असेही नाही. आपापल्या क्षेत्रात चांगले काम करूनही देशासाठी योगदान देता येते. देशातून गरिबी हद्दपार करण्यासाठी, प्रदूषण दूर करण्यासाठी आम्ही काय करू शकतो हा विचार तरुणाईने करणे गरजेचे...

'पुणे - लडाख नवे मैत्रिपर्व शुभारंभ' कार्यक्रमात ते बोलत होते..यावेळी खासदार गिरीश बापट आणि इतर मान्यवर उपस्थित होते..
Body:अनेक तरुण राजकारणापासून स्वतःला दूर ठेवतात. राजकारणात इच्छा नसल्याचे उघड उघड सांगतात. राजकारणापासून दूर जाण्याचा तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीही ते तुमचा पिच्छा सोडणार नाही. त्यामुळे
तरुणांनी राजकारणापासून दूर पळू नये. उलट तरुणांनी घरातुन बाहेर पडावे. जो पक्ष चांगला वाटेल, त्याचा प्रचार करावा पण राजकारणात यावं. राजकारण म्हणजे डर्टी गेम हा विचार डोक्यातून काढून टाकावा. एखाददुसरा व्यक्ती वाईट विचारांचा असला म्हणून संपूर्ण राजकारण वाईट होत नाही..Conclusion:लडाख नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेले आहे. जेवढी नैसर्गिक साधन लडाखमध्ये आहे तितकी देशात इतर कुठे नसेल. सोलर एनर्जीचे अनेक प्रकल्प लडाखमध्ये पहायला मिळतील. लडाखमध्ये अनेक जातीधर्माचे लोकं एकोप्याने राहतात. अशा शांतताप्रिय लडाखला समजून घेण्यासाठी भारताच्या सर्वच राज्यातील नागरिकांनी विशेषतः तरुणांनी लडाखला भेट द्यावी.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.