पुणे - आपल्या देशात प्रामुख्याने अधिकांश नागरिक शाकाहारी जेवण करतात. शाकाहारी म्हणजे काय हे सर्वांना माहीतच आहे. मात्र जगात आता यापुढे वीगन खाद्यप्रकार समोर येत आहे. तर 1 नोव्हेंबरला संपूर्ण जगामध्ये वर्ल्ड वीगन डे साजरा केला जातो. वेगनमध्ये फळभाज्या, धान्य, कडधान्ये, डाळी, ड्रायफ्रूट्स या गोष्टींचा समावेश होतो. हा वेगन डे का साजरा केला जातो. यामागचा प्रमुख उद्दिष्ट काय आहे हे आपण जाणून घेऊया..
1994 साली सुरू करण्यात आली वेगन चळवळ -
वीगन डे हा शाकाहारीचाच एक प्रकार आहे. शाकाहारी चळवळ ही अनाधी काळापासून सुरू आहे. 1994 साली पहिल्यांदा याच शाकाहारी चळवळीचा एक भाग म्हणून वेगन चळवळ सुरू करण्यात आली. प्राणी अधिकार क्षेत्रात काम करणाऱ्या व्ही. फिलिप्स नावाच्या एका व्यक्तीने ही वीगन चळवळ सुरू केली आणि तेव्हापासून 1 नोव्हेंबर हा दिवस जागतिक वीगन डे म्हणून साजरा केला जातो.
शाकाहारीचे अनेक प्रकार असून यात आहे लिकटो व्हेजिटेरियन ते म्हणजे दूध घेतात पण पूर्ण शाकाहारी आहेत. त्यात मांसाहारी पदार्थ ते कोणताच सेवन करत नाहीत. दुसरं आहे वीगन लोक हे लोक दुधाचा वापर करत नाहीत आणि प्राणीजन्य कोणत्याही वस्तूचा वापर करत नाहीत. तिसरा प्रकार आहे ल्याकटो ओव्हर व्हेजिटेरियन यात अंडी खातात पण दुसरं काहीही खात नाहीत. त्याचप्रमाणे एक आहे फ्रूटेरीयन, यात फक्त फ्रुट खाल्ली जातात. पण वीगन चळवळ ही आज जगात खूप प्रसिद्ध होत आहे. वीगन चळवळीचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या चळवळीचा परदेशात मोठ्या प्रमाणात प्रचार आणि पसार होत आहे. तसेच भारतात देखील काही लोक हे वीगन डायट फॉलो करत आहे. यात फक्त वनस्पती जन्य पदार्थांचे सेवन केले जाते आणि याचे फायदे आज जगासमोर येत आहेत, अशी माहिती यावेळी शाकाहारी पुरस्कर्ते आणि सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी दिली.
कोणाला म्हणतात वेगन?
- जे लोक अंडी व प्राण्यांना त्रास देऊन मिळवलेले पदार्थ, डेअरी उत्पादनांचा वापर करत नाहीत.
- हे लोक सामान्य शाकाहारी लोकांप्रमाणे अंडी व अंड्यापासून तयार बेकरी पदार्थही खात नाहीत.
- दूसऱ्या शब्दात सांगायचे तर वीगन एक जीवन जगण्याची पद्धत आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या पशु उत्पादनांचा वापर केला जात नाही. जनावरांचे शोषण व क्रुरतेपासून संरक्षण केले जाते.
- निसर्गातील सर्व प्राण्यांप्रति अहिंसा व करुणेचे वीगन केंद्र आहे.
वेगनमध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थ खात नाहीत-
वीगन डायटमध्ये महत्वाची बाब म्हणजे या डायटमध्ये दूध व दुधापासून तयार करण्यात आलेले पदार्थ खात नाहीत. कारण म्हणजे गाईपासून जास्तीत जास्त दूध मिळवण्यासाठी तिला खाण्यासाठी पिण्यासाठी जेवढं पाणी दिलं जात नाही त्यापेक्षा जास्त पाणी तिला खाण्यासाठी लागणारा चारा बनवण्यासाठी वापरण्यात येतो. त्यामुळे पर्यावरणाची हानी होते, त्यामुळे यात दुधाचे पदार्थ खात नाहीत. सोबतच प्राण्यांपासून मिळणाऱ्या मांस, दुधापासून तयार करण्यात येणारा कोणताही पदार्थ खाण्यास यात मनाई आहे. या डायटमध्ये मांस दूध आणि अंडी पूर्णपणे काढून टाकली जातात. त्याची कमतरता भासू नये यासाठी या डाएटमध्ये फळभाज्या, धान्य, कडधान्ये, डाळी यांसारख्या पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे.
सर्वांनी शाकाहारी होणं गरजेचं -
आज ज्याप्रमाणे फास्ट फूड खाण्याचा प्रकार तरुणांमध्ये वाढत आहे. हे खूप घातक असून या दिवसाच्या निमित्ताने आज मी तरुणांना हे आवाहन करतो की, जर आपल्याला पृथ्वी वाचवायची असेल आणि पृथ्वीवरील पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल आणि पाण्याची समस्या दूर करायची असेल तसेच प्राण्यांवरील अत्याचार दूर करायचे असेल तर आपण शाकाहारी होणं गरजेचं आहे. मांसाहाराची गरज नाही. जे मांसाहारातून मिळतं तेच शाकाहारीतून मिळत असत. त्यामुळे सर्वांनी शाकाहारी होणं गरजेचं आहे असं आवाहन देखील यावेळी डॉ. गंगवाल यांनी केले.