ETV Bharat / city

'ईटीव्ही भारत' विशेष : पुण्याची 'स्मार्ट सिटी'कडे वाटचाल संथगतीने - पुणे स्मार्ट सिटी बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे स्मार्ट सिटी या ड्रीम प्रोजेक्टला चार वर्षे पूर्ण झाली. मागील चार वर्षात अतिशय धीम्या गतीने या प्रकल्पाचे काम सुरू आहे.

पुणे स्मार्ट सिटी
पुणे स्मार्ट सिटी
author img

By

Published : Oct 28, 2020, 7:47 PM IST

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे स्मार्ट सिटी या ड्रीम प्रोजेक्टला चार वर्षे पूर्ण झाली. 25 जून 2016 रोजी नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते या योजनेचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर पुणे स्मार्ट सिटीचा प्रकल्प वेगाने राबवला जाईल, अशी अपेक्षा होती. पण, मागील चार वर्षात अतिशय धीम्या गतीने या प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन झाले तेव्हा 5 हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र, मागील चार वर्षात यातील केवळ 400 कोटींचेच प्रकल्प सुरू झाले आहेत.

बोलताना महापौर, काँग्रेसचे गटनेते व सामाजिक कार्यकर्ते
  • पुणे आता तेराव्या स्थानी

स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यात कामांची सुरुवात धुमधडाक्यात झाली. स्मार्ट सिटीच्या काही प्रकल्पांना राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिकही मिळाली. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारच्या वतीने देशभरातील स्मार्ट सिटीचे रँकिंग जाहीर केले. यामध्ये पुणे स्मार्ट सिटीने 13 व्या स्थानावर झेप घेतली आहे. टाळेबंदीपूर्वी पुणे सतराव्या क्रमांकावर होते. आता तेरावे स्थान प्राप्त केले आहे.

  • अद्याप अनेक प्रकल्प कार्यान्वित नाहीत

पण, असे असले तरी स्मार्ट सिटीचे अनेक प्रकल्प अद्यापही सुरू झाले नाहीत, सुरू झालेले काही प्रकल्प अल्पावधीतच बंद पडले आहेत. मोफत वायफाय, बायसिकल शेअरिंग हे प्रकल्प मध्येच बंद पडले. तर ट्राफिक मॅनेजमेंट, मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्प, ट्रान्सपोर्ट हब, स्मार्ट पार्किंग, चोवीस तास पाणी पुरवठा सेवा, स्मार्ट मिटरिंग यासारखे मोठमोठे प्रकल्प अजूनही कार्यान्वित झालेच नाहीत.

  • काय म्हणाले महापौर

पुणे स्मार्ट सिटीच्या अद्याप सुरूच न झालेल्या प्रकल्पाविषयी बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे स्मार्ट सिटीचे अनेक प्रकल्प सुरू होऊ शकले नाहीत. स्मार्ट सिटीचे अनेक नवीन प्रकल्प सध्या पुर्णत्वाच्या मार्गावर आहेत. कोरोनाचे संकट नियंत्रणात आल्यानंतर स्मार्ट सिटीच्या अनेक प्रकल्पांना गती आल्याचे पुणेकरांना दिसून येईल. स्मार्ट सिटीचे अधिकारी आणि पुणे महापालिकेतील पदाधिकारी यांची नुकतीच एक बैठक झाली आणि या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे बंद पडलेले प्रकल्प लवकरच सुरू झाल्याचे पुणेकरांना पाहायला मिळेल.

  • बाणेर बालेवाडीचा विकास म्हणजे स्मार्ट सिटी नाही

पुणे महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते आबा बागुल मात्र स्मार्ट सिटीच्या कामावर समाधानी नाहीत. ते म्हणाले, केवळ रस्ते बांधणे, नाले बांधणे ही कामे स्मार्ट सिटीची नाहीत. स्मार्ट सिटीने आगामी 50 वर्षाचे नियोजन डोळ्यासमोर ठेवून पाण्यासंबंधी, कचऱ्यासंबंधी आणि वाहतुकी संबंधी नियोजन करणे आवश्यक आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. फक्त बाणेर बालेवाडी या भागाचा विकास झाला म्हणजेच स्मार्ट सिटी झाली असे नाही. स्मार्ट सिटी ही फक्त कागदावरच असल्याची टीका त्यांनी केली.

  • रंगरंगोटी केल्याने कुठलेही शहर स्मार्ट होत नाही

सामाजिक कार्यकर्ते असलेल्या विजय कुंभार यांना मात्र कुठल्याही प्रकारे पुणे शहर अजूनही स्मार्ट झाल्याचे जाणवत नाही. केवळ एखाद्या भागाचा विकास झाला म्हणजे आणि रंगरंगोटी केल्याने कुठलेही शहर स्मार्ट होत नाही. नागरिकांचे जीवनमान सुधारले, त्यांना सुविधा मिळाल्या, त्यांना वाहतुकीच्या अडचणीचा सामना करावा लागला नाही तर त्याला स्मार्ट सिटी म्हणता येईल. परंतु त्या दृष्टीने आता कोणतीही प्रगती होताना दिसत नसल्याचे कुंभार म्हणाले.

हेही वाचा - चोरीच्या बोलेरो जीपचा पाठलाग करून आरोपीस अटक, गुन्हा दाखल होण्यापूर्वीच उघडकीस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.