पुणे - केसरी चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी दिग्दर्शक सुजय डहाके यांनी टीव्ही मालिकांमध्ये ब्राम्हणेत्तर नायिका का नसतात, असा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर डहाके समाजमाध्यमामध्ये चर्चेत आले. केसरी या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले यांची महत्त्वाची भूमिका आहे. डहाकेंच्या या विधानाबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यांनी या विषयावर माहिती नसल्याचे सांगत मनोरंजन क्षेत्रात जातीयवाद असल्याचे सांगितले.
जातीवाद हा आज सुरू झालेला नाही तर फार काळापासून सुरू आहे. जातीवाद करण्याचे काम काही ठरलेले लोक करीत आहेत, अशी टीका ही विक्रम गोखले यांनी यावेळी केली. एबी अँड सीडी चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारने कला क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदीबद्दल भाष्य केले. पीफ आणि नाट्यसृष्टी करिता आजच्या अंदाजपत्रकात करण्यात आलेली तरतूद आनंदाची गोष्ट आहे, असे ते म्हणाले.