ETV Bharat / city

मी शेतकरी फाउंडेशनच्या वतीने पुण्यात कलिंगड आणि खरबूज महोत्सव - Pune latest news in marathi

पुण्यातील कात्रज भागात येथे मुख्य कार्यालय असून करण्याच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने पुणेकरांना याची घरपोच डिलिव्हरी मिळणार आहे.

कलिंगड फेस्टिव्हल
कलिंगड फेस्टिव्हल
author img

By

Published : Mar 9, 2021, 4:34 PM IST

Updated : Mar 9, 2021, 4:51 PM IST

पुणे - उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली, की वेध लागतात ते रसदार फळे खाण्याची. या काळात कलिंगड, द्राक्षे, खरबूज अशी विविध फळे आवडीने खाल्ली जातात. मी शेतकरी फौंडेशनच्यावतीने कलिंगड आणि खरबूज महोत्सवाचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. सामान्यत: लाल रंगाचे कलिंगड बाजारात सहज उपलब्ध असतात. मात्र या महोत्सवामध्ये नागरिकांना विविध जातीचे, वाणाचे आणि विविध रंगाच्या कलिंगडाचा आनंद घेता येणार आहे. यंदाच्या उन्हाळ्यात हंगामातील हा महोत्सव पुढील वर्षीच्या हंगामापर्यंत सुरू असणार आहे. पुण्यातील कात्रज भागात येथे मुख्य कार्यालय असून करण्याच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने पुणेकरांना याची घरपोच डिलिव्हरी मिळणार आहे.

पुण्यात पहिल्यांदाच कलिंगड आणि खरबूज महोत्सव

आम्ही कोणत्या प्रकारची वाणाची, जातीची फळे किंवा भाजीपाला ग्राहकांना पुरवितो, याची माहिती ग्राहकांना वेळोवेळी देत असतो. त्याचबरोबर ग्राहकाने कोणती फळे किंवा भाजी खरेदी केली व कोणती करायला हवी, यासाठी तीन महिन्यांपर्यंत त्याच्या सगळ्या नोंदी घेतो. आम्ही आमच्या शेतात ताज्या भाज्या ग्राहकांना घरी पोहोचवितो. शेतीमध्ये येणाऱ्या असंख्य समस्यांवर आम्ही वेळोवेळी शेतकऱ्यांशी मार्गदर्शन आणि सल्लामसलत करत असतो. शेतकर्‍यांसाठी जागतिक दर्जाच्या कृषी पद्धती व शेतीसाठीच्या पायाभूत सुविधा व ग्राहकांसाठी आंतरराष्ट्रीय अन्नसुरक्षा व मानके आणि सुरक्षित आरोग्यदायी आणि निरोगी अन्न पोहोचवण्यासाठी मी शेतकरी फाउंडेशन कटिबद्ध आहे. पुण्यात मी शेतकरी फाउंडेशनच्यावतीने प्रथमच अशापद्धतीच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. केवळ कलिंगड आणि खरबूज नव्हे तर इतर फळे आणि भाजीपालादेखील ग्राहकांना घरपोच मिळणार असल्याची माहिती यावेळी शेतकरी फाउंडेशनचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी दिली.

'शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हे पहिले प्राधान्य'

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हे आमचे पहिले प्राधान्य आहे. शेतकऱ्यांचे पीक उत्पादन जास्तीत जास्त करण्याबरोबरच त्यांच्या मालाला जास्तीत जास्त बाजारभाव देण्यासाठी आवश्यक नवीन तंत्रज्ञान आणि प्रगत साहित्याचा वापर करण्याच्या दृष्टीने आम्ही शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत असतो, असे देशमुख म्हणाले.

Last Updated : Mar 9, 2021, 4:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.