पुणे - महापालिकेची तब्बल दोनशे कोटीहून अधिक रकमेची पाणीपट्टी थकीत आहे. पाणीपट्टी थकविणाऱ्यांमध्ये माजी खासदार संजय काकडे, निलेश राणे यांच्यासह बांधकाम व्यावसायिक, सरकारी कार्यालय यांचा समावेश आहे. पुणे महानगरपालिकेने या थकबाकीदारांची नावेच आता संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहेत. ही थकबाकी वसूल करण्यासाठी आता महापालिका प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून येत्या 25 जूनपर्यंत ही थकबाकी भरली नाही, तर पाणी जोड कापण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
यांच्याकडे आहेत थकबाकी
एक कोटी पेक्षा अधिक थकबाकीदार असलेल्याची संख्या 86 आहे. तर थकीत रक्कम 22 कोटी 10 लाख आहे. तर 1 कोटी दरम्यान रक्कम थकित असलेल्यांची संख्या 254 आहे. या 254 थकबाकीदारांकडे 58 कोटी 81 लाख इतकी थकीत रक्कम आहे. पाच लाख ते दहा लाख रक्कम थकित असलेल्यांची संख्या 1027 आहे. थकीत रक्कम 60 कोटी रुपये आहे. तीन लाख ते पाच लाख रक्कम थकित असणाऱ्यांची 1336 संख्या आहे. थकीत रक्कम 52 कोटी 15 लाख आहे. थकबाकीदारांच्या यादीमध्ये भाजपाचे माजी खासदार निलेश नारायण राणे यांच्याकडे सुमारे 17 लाख रुपये थकबाकीची आहे. तर माजी खासदार संजय काकडे यांच्या मालकीच्या कंपन्यांचे सुमारे 66 लाख रुपये थकबाकी आहे. याशिवाय पुणे पोलीस आयुक्तालय आणि इतर इमारती यांची थकबाकी सुमारे लाख रुपये आहे. फर्ग्युसन कॉलेज सारख्या नामांकित शिक्षण संस्थेचीही लाख रुपये पाणीपट्टी थकीत आहे.
हेही वाचा -मराठा आरक्षणाबाबत कोल्हापुरात मूक आंदोलन, अशा आहेत मागण्या, आचारसंहिता, रुपरेषा