पुणे - लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन, पीव्हीएसएम, एव्हीएसएम एसेम, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ दक्षिण कमांड यांनी 30 एप्रिल 2022 ला पुण्यातील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी )सह मिलिटरी इंटेलिजन्स स्कुल आणि डेपोला (एमआयएनटीएसडी ) भेट दिली.
महाविद्यालयातील प्राध्यापकांशी संवाद - एएफएमसीच्या भेटीदरम्यान त्यांनी महाविद्यालयातील प्राध्यापकांशी संवाद साधला आणि त्यांच्या जबाबदारीच्या क्षेत्रांतर्गत सैनिकांचे बळकट शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुनिश्चित करण्यासह वर्षानुवर्षे सक्षम वैद्यकीय आणि रुग्णसेवा क्षेत्रात पदवीपूर्व आणि पदव्युत्तर मनुष्यबळ तयार करून लष्करी वैद्यकीय नेतृत्वाला सहाय्य करत असल्याबद्दल प्रशंसा केली.
कौशल्य प्रयोगशाळेला भेट - एएफएमसीच्या दौऱ्याचा एक भाग म्हणून त्यांनी कौशल्य प्रयोगशाळेला भेट दिली. या प्रयोगशाळेत वैद्यकीय प्रशिक्षणासाठी सिम्युलेटर, मॅनेक्विन्स आणि अत्याधुनिक उपकरणे आहेत.अॅडव्हान्स कार्डियाक लाइफ सपोर्ट (एसीएलएस) अभ्यासक्रम शिकत असलेले छात्र तसेच वैद्यकीय आणि परिचर्या अभ्यासक्रमांच्या छात्रसैनिकांशीही त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांना अभ्यास आणि अभ्यासेतर उपक्रमांवर पुरेसा भर देऊन सर्वांगीण विकासासाठी प्रेरित केले.
नियोजनबद्ध आणि प्रभावी प्रशिक्षणाची प्रशंसा - या ठिकाणी आयोजित केलेल्या नियोजनबद्ध आणि प्रभावी प्रशिक्षणाचे जनरल ऑफिसर यांनी प्रशंसा केली. या प्रशिक्षणात नवीन आणि प्रशासकीय व्यवस्थेसंदर्भात सातत्याने केले जाणारे प्रयत्न आणि उपक्रम यांचा समावेश आहे. त्यांनी या प्रशिक्षण केंद्राचा दर्जा वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न जाणून घेतले आणि सशस्त्र दलांच्या प्रमुख प्रशिक्षण संस्थांपैकी एक म्हणून एमआयएनटीएसडीची स्थापन केल्याचे सांगत आपल्या दौऱ्याचा समारोप केला.
सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयासह मिलिटरी इंटेलिजन्स स्कुलला दक्षिण कमांडच्या प्रमुखांनी दिली भेट - pune afmc news
एएफएमसीच्या दौऱ्याचा एक भाग म्हणून त्यांनी कौशल्य प्रयोगशाळेला भेट दिली. या प्रयोगशाळेत वैद्यकीय प्रशिक्षणासाठी सिम्युलेटर, मॅनेक्विन्स आणि अत्याधुनिक उपकरणे आहेत.अॅडव्हान्स कार्डियाक लाइफ सपोर्ट (एसीएलएस) अभ्यासक्रम शिकत असलेले छात्र तसेच वैद्यकीय आणि परिचर्या अभ्यासक्रमांच्या छात्रसैनिकांशीही त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांना अभ्यास आणि अभ्यासेतर उपक्रमांवर पुरेसा भर देऊन सर्वांगीण विकासासाठी प्रेरित केले.