ETV Bharat / city

विलीनीकरणाचा मुद्दा त्यांच्याच वचननाम्यात, चित्रा वाघ यांची टीका

गेल्या 14 दिवसांपासून एसटी कर्मचारी (ST Employee strike)हे आझाद मैदाना(Azad Maidan)वर आंदोलन करत आहेत. मात्र सरकार निर्णय घेत नाही. हे सरकार एकच विषयावर गंभीर आहे, ते म्हणजे आमचे सरकार खंबीर आहे, अशी टीका भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh, Vice President BJP Maharashtra) यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकार(Maha Vikas Aghadi)च्या फसवणुकीच्या दोन वर्षांच्या पूर्ततेवर भाजपा(Maharashtra BJP)ची भूमिका मांडण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

चित्रा वाघ
चित्रा वाघ
author img

By

Published : Nov 24, 2021, 3:11 PM IST

Updated : Nov 24, 2021, 3:22 PM IST

पुणे - आज जे जुगाड करून सरकारमध्ये बसले आहे त्यांचे वचननामे काढून बघा. त्यांनी म्हटले आहे, की आम्ही एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण करू. तरीही आज गेल्या 14 दिवसांपासून एसटी कर्मचारी (ST Employee strike)हे आझाद मैदाना(Azad Maidan)वर आंदोलन करत आहेत. मात्र सरकार निर्णय घेत नाही. लोकांच्या सहनशीलतेचा अंत बघितला जात आहे. हे सरकार गोरगरिबांचे नाही. हे सरकार उपेक्षितांचे नाही. तर हे सरकार यांच्याच मंत्र्यांचे आहे. रोज सकाळी येतात आणि सांगतात, की आमच्या सरकारला धोका नाही. हे सरकार एकच विषयावर गंभीर आहे, ते म्हणजे आमचे सरकार खंबीर आहे, अशी टीका भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh, Vice President BJP Maharashtra) यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकार(Maha Vikas Aghadi)च्या फसवणुकीच्या दोन वर्षांच्या पूर्ततेवर भाजपा(Maharashtra BJP)ची भूमिका मांडण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

'नक्की किती फास्टट्रॅक कोर्ट सुरू आहेत?'

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रश्न आहे, की त्यांनी सांगावे राज्यात नक्की किती फास्टट्रॅक कोर्ट सुरू आहेत. राज्यात 376च्या 1 लाख 63 हजार 112 केसेस प्रलंबित आहेत. राज्यात शिक्षेचे प्रमाण हे 13.67 आहे. सरकार म्हणून या शिक्षांचे प्रमाण वाढण्यासाठी तसेच ज्या प्रलंबित केसेस आहेत, त्या कमी करण्यासाठी काय केले याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, असेही त्या म्हणाल्या.

'हे सरकार मिस्टर नटवरलालचे'

राज्यात आज महिला अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी सांगणारे मुख्यमंत्री या सर्व घटनांबाबत शांत आहेत. ही दोन वर्षे म्हणजे मिस्टर नटवरलालचे, अशी टीका त्यांनी आघाडी सरकारवर केली.

Last Updated : Nov 24, 2021, 3:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.