ETV Bharat / city

पुणे मंडई मधील भाजीपाला, गाळेधारक व्यवसायिक करणार आंदोलन - महात्मा फुले मंडई पुणे

पुण्यातील मंडई येथील भाजीपाला, फळ, पान, तरकारी, पूजा साहित्य व भुसारी विक्रेत्याना पुणे महापालिका व पुणे मेट्रो यांच्याकडून नाहक त्रास दिला जात आहे.

author img

By

Published : Feb 6, 2021, 6:52 PM IST

पुणे - पुण्यातील मंडई येथील भाजीपाला, फळ, पान, पूजा साहित्य व भुसारी विक्रेत्यांना पुणे महापालिका व पुणे मेट्रो यांच्याकडून नाहक त्रास दिला जात आहे. याचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी व मंडई येथील सर्व विक्रेते 11 फेब्रुवारी रोजी मंडई ते जिल्हाधिकारी कार्यालय, असा मोर्चा काढून तीव्र आंदोलन करणार आहेत.

सोमनाथ काची
आमचा मेट्रोला विरोध नाही-
महात्मा फुले मंडईत मेट्रोच्या आराखड्यानुसार कार्यवाही करावी. येथील व्यापारी जागा द्यायला तयार आहेत. परंतु आधी त्यांचे पुनर्वसन करावे, अशी स्थानिकांची मागणी आहे. आमचा मेट्रोला विरोध नाही पण मेट्रोकडून रात्री काम न करता दिवसा काम केले जात आहे. आमच्या येथील रस्ते बंद करून आम्हाला त्रास दिला जात आहे. मेट्रोने त्यांच्या नियमानुसार काम करावे. पण ते त्या नियमानुसार काम करत नसून आम्हाला त्रास देण्याचं काम करत आहेत. म्हणून आम्ही मेट्रोच्या विरोधात ११ फेब्रुवारीला आंदोलन करणार आहोत. मंडई येथील या मध्यमवर्गीय व्यावसायिकांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी या आंदोलनात सहभागी होणार आहे. तसेच या आंदोलनात येथील स्थानिक व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती यावेळी मंडई विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ काची यांनी दिली.

आहे त्या जागी पुनर्वसन करावे-

आहे त्या जागी पुनर्वसन करावे, भाडेवाढ रद्द करावी, गाळे दुरुस्ती करावी, रोज स्वछता व साफसफाई करावी, करारनामा रद्द करावा, यासारख्या मागण्या आमच्या असून महामेट्रोने त्या मान्य कराव्या. गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही याठिकाणी असून जर न सांगता, न अर्ज देता आम्हाला त्रास देत असतील तर ते चुकीचे आहे, असंही यावेळी सोमनाथ काची म्हणाले. यावेळी मंडई विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ काची, वंचित आघाडीचे नितीन शेलार, भाजीपाला संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कासुरड्डे, राहुल खोपडे, संतोष कुदळे, कमलेश काची तसेच सर्व व्यावसायिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा- 'सगळेच उपमुख्यमंत्रीपद मागत असतील, तर अपक्षालाही ते द्यावे'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.