पुणे - आखाड पार्टी सगळीकडे जोरात चालू आहेत. श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. त्यामुळे आता गावरान कोंबड्याची ( Gavran Hen ) मागणी सुद्धा वाढलेली आहे. पुण्यातील इंदिरा गांधी गावरान कोंबड्याच्या मार्केटमध्ये ( Pune Indira Gandhi Market ) सध्या पुणेकरांनी मोठी गर्दी केलेली आहे, आणि व्यापारी ( Pune Traders ) देखील सांगत आहेत, की यावर्षीचा प्रतिसाद चांगला आहे.
पुणेकरांची कोंबड्यासाठी मोठी गर्दी - पुण्यातील इंदिरा गांधी कोंबडी मार्केटमध्ये ( Pune Indira Gandhi Market ) जवळपास 30 ते 35 व्यापारी या ठिकाणी गावरान कोंबड्याचा व्यवसाय करतात. साधारणपणे आषाढांमध्ये या व्यवसायाकडे गर्दी जास्त असते. आणि आता आषाढाचे अवघे 2 दिवस उरल्यामुळे पुणेकर सुद्धा गावरान कोंबड्याचे खरेदी करण्यासाठी आणि मासार करण्यासाठी या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
पुण्यातील जुना बाजार भागामध्ये हा कोंबड्याचा बाजार प्रसिद्ध आहे. इथे नगर, बीड, सोलापूर इथल्या गाव- खेड्यामध्ये जाऊन हे व्यापारी कोंबडी खरेदी करतात. पुण्यामध्ये येऊन विकतात. त्यामुळे गावरान कोंबडे ज्यांना खायची आहेत, ते आवर्जून या मार्केटमध्ये येत असतात.
वनराज नावाचा कोंबड्याला मागणी - प्युअर गावरान कोंबडा जो आहे. त्याला मागणी जास्त आहे. त्याचप्रमाणे वनराज नावाचा कोंबडा आहे, जो भाग देणारा कोंबडा आहे. तो वजनाने ही मोठा असतो, त्याला सुद्धा प्रचंड प्रमाणात मागणी वाढलेली आहे. आज आखाडाचा शेवटचा दिवस असल्यामुळे नागरिक ही मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये येऊन कोंबडी खरेदी करत आहेत, असे येथील व्यापारी सांगत आहेत.
पुणेकराने आषाढात तुराच्या कोंबड्याला जास्त मागणी असते. त्याला वनराज कोंबडा म्हणतात, आणि त्यामुळे पुणेकरांनी महासागरामध्ये गावरान कोंबड्यातील वनराज कोंबड्याला पसंती देत असतात. पुणेकर आवर्जून या वनराज कोंबड्याची मागणी करत आहेत, असे यावेळी दिसून येत आहे.
आषाढी महिना व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचा - आषाढ महिन्यामध्ये गावरान कोंबड्यांना प्रचंड मागणी असते. त्याचे कारण म्हणजे श्रावण सुरू होण्याच्या अगोदर आषाढ महिन्यामध्ये देवधर्म- विधी करण्यासाठी गावरान कोंबडे आवर्जून घेतले जातात. त्यामुळे पुढील एक महिना मांसाहार वर्ज केला असल्याने आषाढ्यातील महिना हा इथल्या व्यापाऱ्यांसाठी व्यवसायासाठी खूप महत्त्वाचा असतो. यावर्षी कोरोनानंतर व्यापार चांगला होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
हेही वाचा - Ajit Pawar Nagpur Visit : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोघांना मोठे कामकाज सांभाळणे अशक्य-अजित पवार