पुणे : ओमायक्रॉनच्या(Omicron Variant in Pune) पार्श्वभूमीवर पुणे शहरातील लसीकरण केंद्रांवर (Pune Vaccination Centre) काही प्रमाणात गर्दी वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लस घेण्यासाठी टाळाटाळ करणारे नागरिक ओमायक्रॉनच्या भीतीने लसीकरण केंद्रांकडे धाव घेत आहेत. या आठवड्यात तब्बल 51 हजाराहून अधिक लोकांनी लस घेतल्याचे महापालिकेच्या आकडेवारी स्पष्ट झाले आहे.
ओमायक्रॉन विषाणूच्या धास्तीने लसीकरण
दुसरी लाट ओसरल्यानंतर ऑक्टोबर / नोव्हेंबर दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत होती. मात्र, या कालावधीमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली नाही. यामुळे काही प्रमाणात नागरिकांमध्ये कोरोनाची भीती कमी झाली होती. यामुळे नागरिक लसीकरणासाठी टाळाटाळ करताना पाहायला मिळाले. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्याचा कालावधी संपूनही देखील नागरिक लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर जाताना दिसत नव्हते. तसेच काही नागरिक पहिला डोस घेण्यासाठीही टाळाटाळ करत होते. मात्र ओमायक्रॉनच्या संभाव्य धोक्याबाबत माध्यमांमध्ये चर्चा होऊ लागल्यानंतर हे नागरिक आता लसीकरणाकडे वळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
ओमायक्रॉन पुण्यात दाखल
गेला आठवडा दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवा आढळला व्हेरियंट सापडला. या व्हेरियंटचा प्रसार सात पट वेगाने होत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने यांची दाखल घेतली. त्यातच हा विषाणू 30 देशात पोचला आणि त्याने भारत आणि पुण्यातही शिरकाव केला. त्यामुळे लस न घेणारे सतर्क झाले असून ते लस घेत आहेत.
एक्कावन्न हजारांनी डोस वाढले
आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात पहिल्या व दुसऱ्या अशा दोन्ही डोसचे मिळून ५१ हजार नागरिकांनी अधिक डोस घेतले आहेत. गेल्या आठवड्यात २० ते २६ नोव्हेंबरदरम्यान पहिला व दुसरा मिळून १ लाख १३ हजार ५१७ नागरिकांनी डोस घेतले. तर ओमायक्रॉनबाबत २७ नोव्हेंबरला माहिती पडल्यानंतर २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरपर्यंत १ लाख ६४ हजार ७८३ जणांनी डोस घेतला आहे. म्हणजेच, या आठवड्यात ५१ हजार नागरिकांनी जास्त डोस घेतला आहे.
पालिकेचे लस घेण्याचे आवाहन
ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे नागरिक लसीकरणाकडे अधिक वळले आहेत. ज्यांनी पहिला डोस घेतला नाही ते पहिला डोस घेत आहेत. ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे, तेदेखील वेळेवर येऊन डोस घेत आहेत. या आठवड्यात पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या वाढल्याचे दिसून येते. ज्यांचा पहिला डोस राहिला आहे, त्यांनी तो घ्यावा आणि ज्यांची दुसऱ्या डोसची तारीख झाली आहे. म्हणजे ८४ दिवस पूर्ण झाले आहेत, त्यांनी देखील दुसरा डोस घ्यावा. असे आवाहन पालिकेचे मुख्य लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी केले आहे.
शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या
कोवीशिल्ड लसीकरण केंद्र १७६
कोव्हॅक्सीन लसीकरण केंद्र १९
एकूण १८७
हेही वाचा - Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्या संपत्ती जप्तीच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाने दिली 14 डिसेंबरपर्यंत स्थगिती
Omicron Variant in Pune : ओमायक्रॉनच्या धास्तीने लसीकरणाचा टक्का वाढला
ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे(Omicron Variant in Pune) नागरिक लसीकरणाकडे अधिक वळले आहेत. ज्यांनी पहिला डोस न घेतलेलेही पहिला डोस घेत आहेत. ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे, तेदेखील वेळेवर येऊन डोस घेत आहेत.