पुणे - चित्रपट व मालिकांमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत नवोदित अभिनेत्रीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. आरोपीविरोधात पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. समीर बाळू निकम असे बलात्काराचा आरोपीचे नाव आहे. आरोपी समीर निकम हा युट्युबवर शॉर्ट फिल्म बनवतो.
आरोपी एका 31 वर्षीय महिलेला चित्रपटात काम मिळवून देतो, असे आमिष दाखवत सलग दोन वर्षापासून तिच्यावर बलात्कार करत होता. आरोपी समीरने युट्यूबवर काही शॉर्ट फिल्म आणि गाणीही बनवली होती.
40 वर्षीय महिलेवर पुजाऱ्याकडून बलात्कार -
नांदेड शहरातील गोपाळ चावडी परिसरातील एका देवीची पूजा करणाऱ्या पुजाऱ्याने एका विवाहितेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. आरोपीविरोधात पोलिसांनी बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
पुष्पक एक्सप्रेस सामूहिक बलात्कार प्रकरण -
खनौहुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या धावत्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये दरोडा पडल्याची घटना समोर आली होती. ही घटना इगतपुरी ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान घडली. सात ते आठ दरोडेखोरांनी एक्स्प्रेसमध्ये अचानक प्रवेश केला. त्यांनी 10 ते 20 प्रवाशांना धाक दाखवून रोकड, मोबाईल आणि दागिने लुटली. तर धक्कादायक बाब म्हणजे दरोडेखोरांनी 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले.
हेही वाचा - बस - ट्रेनमधील बलात्काराच्या 'या' घटनांनी हादरले होते महाराष्ट्र, वाचा सविस्तर...