ETV Bharat / city

घाबरणाऱ्यातला मी नाही, सहनशीलतेचा अंत पाहू नका.. उदय सामंत यांचा हल्लेखोरांना इशारा - उदय सामंत यांच्या कारवर कात्रज येथे हल्ला कार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर असताना हडपसर येथील कार्यक्रम केल्याने ( Attack on uday samant car in katraj in pune ) त्यांच्या सोबत असलेले राज्याचे माजी मंत्री उदय सामंत यांच्या कारवर कात्रज ( Uday samant car attacked pune) येथे काही अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Etv Bhaattack on uday samant car in katraj in pune rat
Etv Bharउदय सामंत कार हल्ला कात्रज पुणे at
author img

By

Published : Aug 3, 2022, 6:37 AM IST

पुणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर असताना हडपसर येथील कार्यक्रम केल्याने ( Attack on uday samant car in katraj in pune ) त्यांच्या सोबत असलेले राज्याचे माजी मंत्री उदय सामंत यांच्या कारवर कात्रज ( Uday samant car attacked pune) येथे काही अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा भ्याड हल्ल्यांमुळे आम्ही कोणीही एकनाथ शिंदे यांची साथ सोडून पळून जाणार नाही, घाबरणार नाही. त्यामुळे, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा सामंत यांनी हल्लेखोरांना आणि हल्ल्यामागील सूत्रधारांना दिले.

माहिती देताना आमदार उदय सामंत

हेही वाचा - Eknath Shinde : निवडून येण्यासाठी मला निवडणूक चिन्हाची गरज नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर बाण

माजी मंत्री उदय सामंत यांच्यावर जो हल्ला करण्यात आला आहे त्या हल्ल्यात कोणालाही दुखापत झालेली नाही. पुण्यातील कात्रज येथे सिग्नलवर सामंत यांची कार थांबली असताना रात्रीच्या सुमारास हा हल्ला झाला. याबाबत सामंत यांनी कोथरूड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.

माझी कार ही कात्रज येथील सिग्नलला थांबली होती. त्यावेळी माझ्या बाजूला एक गाडी थांबली आणि त्यातून दोन जण उतरले. त्यांच्या हातात बेसबॉलची बॅट होती तर दुसऱ्याने हाताला दगड बांधला होता. त्यांनी मला शिव्या देण्यास सुरूवात केली. दुसऱ्या बाजूने आलेल्या काहींच्या हातात सळ्या होत्या. या लोकांनी कार वर चढून माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. असा भ्याड हल्ला करून आमचे लोक एकनाथ शिंदेंना सोडून पळून जातील असे वाटत असेल तर ते चुकीचे आहेत. उलट आजच्या हल्ल्याने आम्ही अधिकच जवळ आलो आहोत. असले भ्याड हल्ल्यांना घाबरणारा नाही, असे उदय सामंत म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मी कोणावर टीका करत नाही म्हणून आमच्या सहनशीलतेचा अंत कोणी बघू नये. या हल्ल्याने दाखवून दिले की राज्यातील राजकारण किती हीन आणि खालच्या पातळीला चालले आहे.

हेही वाचा - CM Eknath Shinde : ...अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मारली जोरदार किक; पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.