पुणे - ओबीसी समाजाला संपूर्ण आरक्षण मिळाले पाहिजे. जो 27 टक्के आरक्षण आहे, ते संपूर्ण 27 टक्के आरक्षण ओबीसी समाजाला मिळाले पाहिजे. जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत सरकारने निवडणुका घेऊ नये, अशी मागणी देखील यावेळी कराड ( Bhagwat Karad comment on OBC reservation ) यांनी केली.
हेही वाचा - Pune Police Seized Gutkha : पुणे पोलिसांनी जप्त केला तब्बल 75 लाखांचा गुटखा
ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण देता येणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायलयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. यानंतर राज्यातील होऊ घातलेल्या निवडणुकींबाबत विविध राजकीय पक्षांकडून मतमतांतरे व्यक्त केली जात आहे. केंद्रीय राज्य मंत्री भागवत कराड यांनीही याबाबत सदर मत व्यक्त केले.
पुण्यात आज वंजारी समाजाचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यानंतर ते पत्रकारांशी बोलत आहे.
मी आज जे काही ते फक्त ओबीसी समजामुळेच
आज वंजारी समाजाचा मेळावा पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. यात गुणवंत लोकांचा सत्कार करण्यात येणार आहे. मी वंजारी समजातच वाढलो आहे आणि याच समाजाचा मी कार्यकर्ता आहे. ओबीसी समजामुळे मी एक चांगला डॉक्टर होऊ शकलो. मी दिल्लीत गेलो ते फक्त आणि फक्त ओबीसी समाजामुळेच. त्यामुळे, आजचा कार्यक्रम हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, असे देखील यावेळी कराड म्हणाले. तसेच, आज जो काही कार्यक्रम आहे तो कार्यक्रम कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून होत आहे, असे देखील यावेळी कराड म्हणाले.
हेही वाचा - Message Of Fitness : फिटनेसच्या संदेशासाठी पोलीस अधिकाऱ्याची देहू ते पंढरपूर सायकल वारी!