ETV Bharat / city

यंदा दुष्काळी पट्ट्यातही हवेचा दाब राहिला कमी... जाणून घ्या मान्सून लांबल्याचे कारण! - un even distribution of rain in india

यंदाच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये मान्सून जोरदार बरसला. खास करून परतीच्या मान्सूनने महाराष्ट्राच्या अनेक भागात जोरदार हजेरी लावली. यंदाच्या वर्षी जून ते ऑक्टोबर या कालावधीत मान्सून कशा पद्धतीने विविध भागात बरसला याबाबत कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेली ही विशेष माहिती.

पावसाचे असमान वितरण
पावसाचे असमान वितरण
author img

By

Published : Oct 27, 2020, 10:08 PM IST

Updated : Oct 28, 2020, 3:17 AM IST

पुणे - यंदाच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये मान्सून जोरदार बरसला. खास करून परतीच्या मान्सूनने महाराष्ट्राच्या अनेक भागात जोरदार हजेरी लावली. पावसाचे असमान वितरण हेच यंदाच्या पावसाचे मोठे वैशिष्ट्य राहिले आहे. कुठे सरासरीहून अधिक तर कुठे सरासरीपेक्षाही कमी पर्जन्यमान राहिले. ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात तर राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली.

बोलताना हवामान तज्ज्ञ

यंदा लॉकडाऊनमुळे जगभरातील सर्वप्रकारची वाहने थांबली होती. त्यामुळे हवामानातील कार्बन डाय-ऑक्साइड, कार्बन मोनॉक्साईडची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. जगभराचा विचार केला तर तब्बल 30 टक्क्यांपर्यंत कार्बन-डाय-ऑक्‍साईडची पातळी कमी झाली होती, महाराष्ट्राच्या हवामानावर याचा परिणाम झाला. महाराष्ट्रातल्या पंधरा हवामान केंद्रांवर यंदाचे पर्जन्य वितरण नोंदवण्यात आले. विदर्भ, मराठवाडा, खानदेश ,कोकण, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणच्या हवामान केंद्रांच्या अभ्यासावरून उन्हाळ्यात या ठिकाणचे तापमान दोन अंश सेल्सिअसने कमी झाले होते. तापमान कमी झाल्यानंतर हवेच्या दाबात फरक पडतो आणि हेच मुख्य कारण यंदा मान्सूनच्या पथ्यावर पडले.

३० जूननंतर मान्सूनचे बदलले चित्र

पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणात जून महिन्यात मान्सून कमी होता. विदर्भात थोडा कमी तर मराठवाड्यात मात्र चांगला पाऊस झाला होता. 30 जून ते 1 सप्टेंबर हा कालावधी पाहिला तर पूर्ण चित्र बदलले यात औरंगाबादला सरासरीपेक्षा 89 टक्के पाऊस जास्त झाला. बीडमध्ये 40% , जालना 39% ,उस्मानाबाद 25% , सोलापूर 25%, सांगली 26 टक्के , पुणे 39 टक्के, जळगाव 24 टक्के, धुळे 47% , ठाणे 20%, कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी 23 टक्‍के सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचं दिसून आलं.

विदर्भात पावसाचे असमान वितरण

या कालावधीत काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला असे दिसून येत असले तरी याच कालावधीत काही भागात मात्र पावसाची कमतरता होती. यामध्ये विदर्भातील जिल्ह्यांच्या तुलनेत अकोल्यात सरासरीपेक्षा 27 टक्के कमी पाऊस झाला. तसेच यवतमाळला 24 टक्के कमी, अमरावतीला 20 टक्के कमी, चंद्रपूरला 18 टक्के कमी, वर्धा आठ टक्के, गडचिरोली आठ टक्के कमी पाऊस झाला, गोंदिया आठ टक्के कमी, भंडारा 4 टक्के कमी पाऊस झाला. एकंदरीतच महाराष्ट्राचा विचार केला तर या कालावधीमध्ये 15 जिल्ह्यात सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस झाला तर दुसरीकडे आठ जिल्ह्यात सरासरीच्या कमी पाऊस झाला. एकंदरीतच पावसाचीही असमानता यंदाच्या मान्सूनचे वैशिष्ट राहिले आहे.

जून ते सप्टेंबर एक टप्पा तर १ ते २१ ऑक्टोबर दुसरा टप्पा

सप्टेंबर महिन्याच्या मध्याला राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस तर 12 जिल्ह्यांमध्ये अधिक पाऊस अशी असमानता तसेच हवामानातील विविधता दिसून आली. यंदाच्या मान्सूनचा विचार केला आणि त्याचे वर्गीकरण केले तर 30 जून ते 30 सप्टेंबर हा एक टप्पा आणि 1 ऑक्टोंबर ते 21 ऑक्टोबर हा एक टप्पा मानता येईल. एक ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर या काळात तुफान पाऊस झाला. खरंतर हा परतीचा पाऊस मात्र महाराष्ट्राच्या अनेक भागांना या कालावधीमध्ये जोरदार तडाखा बसला एक ऑक्टोबरनंतर मान्सूनचे चित्र एकदम पालटले. उस्मानाबाद सारख्या कमी पावसाच्या ठिकाणी या काळात तब्बल सरासरीच्या 228 टक्के इतका तुफान पाऊस झाला, अहमदनगर मध्ये 112 टक्के, पुण्याला 192 टक्के, सोलापूरला 193%, सातारा 121 टक्के, सांगली 184 टक्के अधिक पाऊस झाला. कोल्हापूरमध्ये 122 टक्के अधिक सिंधुदुर्गमध्ये 195 टक्के अधिक रत्नागिरीमध्ये 155 टक्के अधिक मुंबईमध्ये तर तब्बल दोनशे चाळीस टक्के अधिक सरासरीच्या पाऊस झाला आहे. या कालावधीमध्ये एकीकडे राज्याच्या वरील भागामध्ये जोरदार पाऊस होत असताना काही भागात कमी पाऊस नोंदला गेला. ज्यात नंदुरबारमध्ये सरासरीच्या 98 टक्के कमी बुलडाणा याठिकाणी 60 टक्के कमी, जळगाव पन्नास टक्के कमी, धुळे 22 टक्के कमी, अकोला 19 टक्के कमी तसेच पूर्व विदर्भाच्या काही भागांमध्ये कमी पाऊस नोंदवला गेला.

प्रदुषण कमी झाल्याने दुष्काळी पट्ट्यातही हवेचा दाब राहिला कमी

एकंदरीतच यंदाच्या मान्सूनचा विचार केला तर पावसाची विषमता यावर चर्चा होते आहे. तज्ञांच्या मते याची दोन कारणे देता येतील. हवामान बदल तसेच कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण कमी झाल्याने कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण असंतुलित झाले. त्यामुळे हवेचा दाब बदलला. दुष्काळी पट्ट्यांमध्ये हवेचा दाब कमी राहिला. त्याठिकाणी जास्त पाऊस झाला. एकंदरीतच यंदाचा मान्सूनमध्ये पावसाच्या वितरणाची विषमता हेच मोठे वैशिष्ठ राहिले आहे.

Last Updated : Oct 28, 2020, 3:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.