ETV Bharat / city

Metro Station Pune : पुण्यात होणार अंडरग्राऊंड छत्रपती शिवाजीनगर मेट्रो स्टेशन ; 85 टक्के काम पूर्ण - मेट्रो स्टेशन पुणे

पुण्यातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी नगर अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाचे काम (Underground Metro Station) हे वेगाने सुरू असून  हे स्थानक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाप्रमाणे खास होणार आहे. या स्थानकाचे 85 टक्के काम हे पूर्ण झाले असून उर्वरित काम हे येत्या दीड महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती पुणे मेट्रो प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली (Chhatrapati Shivaji Nagar Metro Station in Pune) आहे.

Metro Station Pune
पुण्यातील अंडरग्राऊंड छत्रपती शिवाजी नगर मेट्रो स्टेशन
author img

By

Published : Oct 11, 2022, 12:45 PM IST

पुणे : पुण्यातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी नगर अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाचे काम (Underground Metro Station) हे वेगाने सुरू असून हे स्थानक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाप्रमाणे खास होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची आणि पुण्याच्या इतिहासाची साक्ष हे स्थानक देणार आहे. या स्थानकाची वास्तू ही तत्कालीन वाड्यांसारखी बांधली जाणार आहे. तसेच स्थानक परिसरात पुरातन नदीचे घाट, मेघडंबरी आणि दीपमाळ देखील बांधल्या जाणार असल्याने हे स्थानक सर्वांचे आकर्षण ठरणार असून या स्थानकाचे 85 टक्के काम हे पूर्ण झाले असून उर्वरित काम हे येत्या दीड महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती पुणे मेट्रो प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली (Chhatrapati Shivaji Nagar Metro Station in Pune) आहे.

Metro Station Pune
पुण्यातील अंडरग्राऊंड छत्रपती शिवाजी नगर मेट्रो स्टेशन

स्वागतासाठी शनिवारवाड्याची प्रतिकृती - शिवाजीनगर परिसरात ३०० मीटर रस्त्याखाली मेट्रो भूमिगत मेट्रो स्थानकाची निर्मिती करण्यात येत आहे. शिवाजीनगर मेट्रो स्टेशन हे पुण्यातील पाहिले भूमिगत मेट्रो स्थानक आहे. येथे शनिवारवाड्याची प्रतिकृती स्वागतासाठी उभारण्यात येणार आहे. यामुळे जुन्या पुणे शहरात आपण वावरत आहे. असे याठिकाणी चालताना लोकांना वाटणार आहे. तसेच या स्टेशनच्या आजूबाजूला देशी झाडे ही लावण्यात येणार आहे. जुने कारंजे, कलाकृती ही याठिकाणी दाखविण्यात येणार आहे ज्यामुळे जुनी आर्ट गॅलरी पाहता येणार आहे.मेट्रो स्टेशन येथे येण्यासाठी साखर संकुल, आकाशवाणी आणि रेल्वे स्टेशन बाजूने अशा तीन जागेवरून प्रवेश करता येणार आहे. शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथून थेट मेट्रो स्थानकात येता येणार आहे. पाच लिफ्ट आणि १२ सरकते जिने बसविण्यात येणार आहे, असं देखील यावेळी दीक्षित (Chhatrapati Shivaji Nagar Metro Station) म्हणाले.

प्रतिक्रिया देताना व्यवस्थापकीय संचालक महामेट्रो ब्रिजेश दीक्षित

पिंपरी ते शिवाजी नगर मेट्रो लवकरच - या स्थानकाचे काम हे पूर्ण होत असून पिंपरी ते शिवाजी नगर मार्ग लवकरच सुरू करण्याचे नियोजन आहे. या स्थानकाची चाचणी ही नोव्हेंबर महिन्यात घेतली जाणार आहे. सर्व स्थानकांची कामे ही जवळपास पूर्ण झाली आहेत. पिंपरी ते कोर्ट परिसर ही लाईन वाहतुकीसाठी सुरू केली जाणार आहे. सधारण नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यापर्यंत ही कामे केली, जाईन असेही दीक्षित यांनी (Underground Chhatrapati Shivaji Nagar Metro) सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.