ETV Bharat / city

Torrential rains in Pune : पुण्यातील नाना पेठ येथे एका दुमजली वाड्याची भिंत कोसळून दोन जण जखमी

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ( Torrential rains in Pune ) शहरातील अनेक भागांमध्ये झाड पडण्याच्या घटना ( Tree Falling in Many Parts of City ) घडल्या आहेत. त्याचबरोबर जुन्या वाड्यांमधील भिंत कोसळण्याच्या घटनाही घडताना दिसून येत आहे. काल नाना पेठ येथील मॉडर्न बेकरीसमोर एका दुमजली वाड्याची भिंत कोसळून ( wall of a two-storey mansion collapsed ) दोन जण जखमी, तर अन्य दोघांची अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली आहे.

author img

By

Published : Jul 12, 2022, 10:59 AM IST

The wall of a two-storied mansion collapsed in front of the Modern Bakery at Nana Peth
नाना पेठ येथील मॉडर्न बेकरीसमोर एका दुमजली वाड्याची भिंत कोसळली

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील ( Torrential rains in Pune ) अनेक भागांमध्ये झाड पडण्याच्या घटना घडल्या आहेत. ( Tree Falling in Many Parts of City ) त्याचबरोबर जुन्या वाड्यांमधील भिंत कोसळण्याच्या घटनाही घडताना दिसून येत आहे. काल नाना पेठ येथील मॉडर्न बेकरीसमोर ( Modern Bakery at Nana Peth ) एका दुमजली वाड्याची भिंत कोसळून ( wall of a two-storey mansion collapsed ) दोन जण जखमी, तर अन्य दोघांची अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली आहे.

नागरिकांना काढले सुखरूप बाहेर : ही घटना काल रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. यात कमलाकर झिंजुर्के आणि स्मिता जाधव हे जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तर राजेंद्र झिंजुर्के आणि भारती झिंजुर्के हे जे वाड्यात अडकले होते. त्यांना अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. पुण्यातील बरेच वाडे, इमारती हे जीर्ण अवस्थेत आहेत. त्यांची दुरुस्ती करण्याची गरज असताना, नागरिक तसेच राहत आहेत. अशा मुसळधार पावसात कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता असते.

नवीन बांधकाम चालू असल्याने घटना घडली : नाना पेठ येथील मॉडर्न बेकरीसमोर दोन मजली वाडा असून, त्याच्या शेजारी नवीन बांधकाम चालू असल्याने फाउंडेशनसाठी खड्डे खोदले होते. शहरात सतत सुरू असलेल्या पावसामुळे रात्रीच्या 10 वाजल्याच्या या वाड्यातील भिंत कोसळली आणि वाड्यात अडकलेल्या चार जणांपैकी 2 जण हे जखमी झाले असून, बाकी दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले आहे. अग्निशामक दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर, जवान चंद्रकांत गावडे, मनीष बोंबले , महेंद्र कुलाळ, विठ्ठल शिंदे, चंदकांत मेनसे, दिंगबर बांदिवडेकर, शिर्के व चालक अतुल मोहिते आणि कर्णे यांच्या पथकाने हि कामगिरी केली.

महापालिकेने पाच दिवसांपूर्वीच दिल्या होत्या नोटिसा : पाच दिवसांपूर्वी पुणे महापालिकेने शहरातील जुन्या वाड्या आणि इमारतींना नोटीसा पाठवायला सुरुवात केली होती. शहरातील जुने वाडे धोकादायक परिस्थितीत असल्याने त्यांना रिकामे करा अथवा पाडा अशी नोटीस महापालिकेने सर्व वाड्यांवर लावली आहे. पुणे पालिकेकडून जवळपास 450 वाड्यांना नोटीस देण्यात आली आहे. पुण्यातील अती धोकादायक जुने वाडे पालिकेकडून पाडण्यातही आले आहेत. या वाड्याची अवस्था फार बिकट आहे.

पुणे शहरासह जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला होता : हवामान विभागाने मागील पाच दिवसांपूर्वीच अतिवृष्टीचा इशारा दिला होता. राज्यासह पुणे जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील जी धोकादायक गावे, वस्ती आहेत. अशा ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने योग्य खबरदारी घेतली आहे. लोकांना रस्ते, आरोग्य, अन्नधान्य, वीज या सर्व सुविधा तसेच गावांमध्ये वॉकीटॉकी देण्यात आले आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

पुण्यात गेली चार दिवसांपासून मुसळधार पाऊस : पुणे शहरात मागील चार दिवसांपासून पावसाची मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याच दरम्यान, चार दिवसांपूर्वी शुक्रवार पेठेतील नेहरु चौक येथील ८० वर्ष जुना असलेला कारंडे यांच्या तीन मजली वाड्याचा काही भाग कोसळला आहे. या घटनेत अडकलेल्या सहा जणांना बाहेर काढण्यात अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे.

जुना कारंडे वाड्याचा भाग कोसळला : पाच दिवसांपूर्वीच शुक्रवार पेठेतील नेहरु चौक येथील ८० वर्ष जुना असलेला कारंडे यांच्या तीन मजली वाड्याचा काही भाग कोसळला होता, त्यानंतर अग्निशामक दलाचे जवान पुढील पाच मिनिटात घटनास्थळी पोहचलो. त्या वाड्यात तीन जणांचं कुटुंब राहण्यास आहे. त्यापैकी सहा जण दुसर्‍या मजल्यावर अडकून पडले होते. त्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असल्याचे अग्निशामक विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

हेही वाचा : पुण्याच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस; इमारतींच्या पार्किंगमध्ये शिरले पाणी

हेही वाचा : ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा; इतिहासात पहिल्यांदाच शिवलिंग पाण्याखाली!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.