ETV Bharat / city

Pune Crime : सीआयडी मालिका पाहून अल्पवयीन मुलांनी वृद्धेचा खून करून केली चोरी

पुण्यात घरात एकट्या राहत असलेल्या ७० वर्षाच्या महिलेचा खून करुन घरातील पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा गुन्हा उघडकीस आणण्यात सिंहगड रोड पोलिसांनी यश आले आहे.

crime
सिंहगड रोड पोलीस स्टेशन
author img

By

Published : Nov 6, 2021, 8:20 PM IST

Updated : Nov 6, 2021, 9:45 PM IST

पुणे - घरात एकट्या राहत असलेल्या ७० वर्षाच्या महिलेचा खून करुन घरातील पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा गुन्हा उघडकीस आणण्यात सिंहगड रोड पोलिसांनी यश आले आहे. दोन अल्पवयीन मुलांनी सीआयडी मालिका पाहून चोरीसाठी या खुनाचा कट रचला व त्यानुसार त्याची अंमलबजावणी केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

पुण्यातील सायली हाईटस फ्लॅट नं. ०७ हिंगणे खुर्द येथील घरामध्ये चोरी झाली. तसेच घरामध्ये वयस्कर महिला या जखमी व बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. लगेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे व तपास पथकाची टीम घटनास्थळावर तत्काळ जाऊन पाहणी केली. यावेळी महिला शालिनी बबन सोनवणे (वय ७०) या बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या होत्या. तसेच घरामधील कपाट उघडे असून कपाटातील सोन्याचे दागिणे व रोख रक्कम चोरी झाल्याचे दिसले. घटनास्थळाचे निरीक्षण करता, चोरी करण्याच्या उद्देशाने अज्ञात चोरट्याने ७० वर्षीय महिलेचा खून केल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

हेही वाचा - वाशिम : लग्न लावत नाही म्हणून मुलाने केली बापाची हत्या

दोन लहान मुलांनी केला खून -

सिंहगड रोड पोलीस स्टेशनची टीम तपास करत असताना, सदर घटनास्थळावर कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने घटनेचा वेगवेगळ्या दृष्टीकोनातून तपास केला जात होता. गुन्ह्याच्या अनुषंगाने वेगवेगळी माहिती तपास पथकाला मिळत होती. परंतु कोणताही सबळ धागा सापडत नव्हता, घटना घडून ४८ तास झाले तरी देखील पोलिसांना अज्ञात आरोपींचा माग लागत नव्हता. त्यामुळे घटनेचे गांभीर्य वाढत चालले होते. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले होते. 2 नोव्हेंबरला तपास पथकाचे पोलीस अंमलदार उज्जव मोकाशी यांना घटनास्थळाजवळील रोकडोबा मंदिराजवळ लहान मुलांकडून माहिती मिळाली की, 30 ऑक्टोबर रोजी दुपारी पाणीपुरी खायला जाताना, त्याचे दोन मिञ पाणीपुरी न खाताच परत गडबडीने घरी आले होते. तसेच त्या मुलांचे घाईगडबडीत जाण्याचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाल्याने त्यावर अधिक संशय बळावल्याने सदरच्या माहितीच्या आधारे त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली. सदरची मुले न गडबडता व चेहऱयावरती कोणताही हावभाव न दाखवता उडवाउडवीची उत्तरे देत होती. या मुलांबाबत अधिक माहिती घेता, त्यातील एका मुलाला स्वःताच्या घरामध्ये चोरी करण्याची सवय असल्याबाबत माहिती समोर आली. त्यानंतर त्यांना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता धक्कादायक माहिती समोर आली व त्यांनी गुन्हा केल्याचे कबुली दिली. सदर मुलांचे वय १६ व १४ वर्ष आहे.

असा केला या मुलांनी गुन्हा -

मृत महिलेकडे कायम खूप पैसे असतात व ते पैसे कोठे ठेवतात याबाबत माहिती त्या मुलांना होती. सुमारे दोन महिन्यापूर्वीच त्यांनी सीआयडी मालिका पाहून चोरी करण्याचा कट रचून महिलेच्या घराची चावी चोरली होती. परंतु त्या महिला या वयस्कर असल्याने त्या घर सोडून कोठेही जात नसे. त्यामुळे त्या मुलांना चोरी करता येत नव्हती. त्यानंतर त्यांनी घरात मृत महिला एकटया असताना घरात जाऊन चोरी करण्याची योजना आखली. तसेच महिलेने विरोध केला तर त्यांना मारण्याचीही तयारी केली होती.

30 ऑक्टोबरला दुपारी महिला या घरामध्ये एकट्या असल्याबाबत मुलांनी खात्री करुन घरामध्ये प्रवेश केला. त्यावेळी महिला या टीव्ही पाहत होत्या, त्यावेळी ती मुलेही टीव्ही पाहू लागले. महिलेचे लक्ष नसताना त्यांना पाठीमागून ढकलून देऊन त्यांचे तोंड व नाक दाबून खून केला. त्यानंतर कपाटातील ९३ हजार रुपये रोख रक्कम व ६७ हजार ५०० रुपये रकमेचे सोन्याचे दागिणे असा एकूण १ लाख ६० हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी करुन नेला होता. सदरचा गुन्हा करताना सीआयडी मालिका पाहून आपल्या हाताचे ठसे कोठे उमटू नये याकरिता त्या मुलांनी हॅण्डग्लोजचा वापर केला होता. मुलांनी चोरलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिणे त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले आहेत.

हेही वाचा - मोबाईल अन् स्पीकरसाठी गच्चीवरुन ढकलून केला मित्राचा खून, आरोपी अटकेत

Last Updated : Nov 6, 2021, 9:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.