पुणे - निर्भया प्रकरणातील आरोपींना उद्या(शुक्रवार) फासावर लटकवले जाणार आहे. दरम्यान, उद्याचा दिवस महिलांसाठी सुवर्णदिन असेल, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी दिली आहे.
या आरोपींना फासावर लटकवल्यानंतर न्यायाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या लाखो निर्भयांना न्याय मिळेल, असा संदेश त्यांच्यापर्यंत जाईल. अशाप्रकारे जे गुन्हे करतात त्यांच्यावर दहशत बसवण्यासाठी हा निर्णय महत्वपूर्ण ठरेल, असेही देसाई यांनी सांगितले.