ETV Bharat / city

पुण्यात मागील वर्षी मृत्यू झालेल्या गव्यासाठी प्रायश्चित सभेचे आयोजन, बॅनरही लावले

author img

By

Published : Dec 6, 2021, 2:40 AM IST

गेल्या वर्षी कोथरूड भागत रानगवा शिरला होता. पकडल्यानंतर या गव्याचा मृत्यू झाला होता. येत्या ९ डिसेंबरला या घटनेला एक वर्ष पूर्ण होणार आहे. या निमित्ताने पुण्यातील प्राणी प्रेमी आणि निसर्ग मित्र मंडळाच्या वतीने प्रायश्चित सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तशा माहितीचे बॅनर देखील लावण्यात आले आहे.

indian gaur died in pune last year
रानगवा श्रद्धांजली बॅनर कोथरूड

पुणे - गेल्या वर्षी कोथरूड भागत रानगवा शिरला होता. पकडल्यानंतर या गव्याचा मृत्यू झाला होता. येत्या ९ डिसेंबरला या घटनेला एक वर्ष पूर्ण होणार आहे. या निमित्ताने पुण्यातील प्राणी प्रेमी आणि निसर्ग मित्र मंडळाच्या वतीने प्रायश्चित सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तशा माहितीचे बॅनर देखील लावण्यात आले आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा - 2024 ची निवडणूक देशासाठी निर्णायक, मोदींचा पराभव न झाल्यास लोकशाही संपेल : पृथ्वीराज चव्हाण

कोथरुड भागात मागच्या वर्षी 9 डिसेंबरला रानगवा आल्याने सर्वच यंत्रणांची तारांबळ उडाली होती. सात तासांच्या थरार नाट्यानंतर त्याला बेशुद्ध करून पकडण्यात वन विभागाला यश आले होते. परंतु, नंतर या गव्याचा मृत्यू झाला होता. गव्याला पकडताना अनेक अडचणींचा सामना वनविभागाला करावा लागला. लोकांच्या गर्दीमुळे आणि आरडाओरडामुळे गवा बिथरला आणि इतरत्र धावत होता. यात तो गंभीर जखमी देखील झाला होता. या घटनेनंतर प्राणी मित्रांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. आता या घटनेला येत्या 9 डिसेंबरला एक वर्ष पूर्ण होणार आहे. आणि त्या पर्श्वभूमीवर पुण्यातील समस्त प्राणी आणि निसर्ग मित्र मंडळाच्यावतीने प्रथम पुण्यस्मरण आयोजित करण्यात आले आहे. या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने प्रायश्चित सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात लावण्यात आलेल्या बॅनरबाबत पुण्यात सर्वत्र चर्चा आहे.

नेमके काय घडले होते?

9 डिसेंबर 2020 रोजी सकाळी आठच्या सुमारास जखमी रानगवा कोथरूडच्या महात्मा सोसायटीच्या परिसरात आला. पहाटे फिरण्यासाठी आलेल्या लोकांनी हा विचित्र प्राणी पाहिला. त्यामुळे घाबरलेल्या लोकांनी अग्निशमन दल, पोलीस आणि वन खात्याला त्याची माहिती दिली. त्यामुळे, या विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्याची माहिती पुणेकरांना कळताच पुणेकरांनी घटनास्थळी धाव घेऊन गर्दी केली. या गव्याची दिवसभर धरपकड सुरू होती. त्यामुळे, लोकांची गर्दी वाढल्याने हा रानगवा बिथरला. त्यातच वनखाते आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे, तो आणखीनच बिथरला. त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्धही केले. पण बिथरलेल्या या गव्याचा अखेर मृत्यू झाला होता.

हेही वाचा - Etv Bharat Special - वाचा... गावातील पहिल्या पदव्युत्तर मुलीचा संघर्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.