पुणे - राज्याचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प मांडला जात असताना विविध क्षेत्रांच्या या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा आहेत. तशा व्यापारी वर्गाच्याही या अर्थसंकल्पाकडून आशा आहेत. देशामध्ये 'वन नेशन वन टॅक्स' ही पद्धत अवलंबली जात असताना महाराष्ट्र राज्यात मात्र एकच कर पद्धत नाही. महाराष्ट्रात जीएसटीसोबतच इतर करही आकारले जात असल्याने व्यापारी वर्ग नाराज आहे.
या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांवर असलेले कर रद्द करावेत, राज्यभरातील मार्केट यार्डांमध्ये असलेला सेस रद्द करावा, अशी अपेक्षा व्यापारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आपल्या या अर्थसंकल्पातून व्यापाऱ्यांना दिलासा देतील, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.