ETV Bharat / city

Lingya Ghat : लिंग्या घाटातील सुळक्यावर चढून पर्यटकांचा जीवघेणा फोटोशूट

राज्यासह पुणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस ( Heavy Rain ) झाला. पावसात सह्याद्रीमध्ये भटकंती करणाऱ्यांची संख्या ही यंदा वाढत असून, नवनवीन ठिकाणी पर्यटक हे गर्दी करू लागले आहे. अनेक गड-किल्ले तसेच सह्याद्रीच्या विविध ठिकाण हे सेल्फी पॉइंट, धबधबे पर्यटकांचे आकर्षण बनू लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात ( Mulshi Taluka ) धामण ओहोळ हे एक गाव ( Dhaman Ohal village ) आहे. या ठिकाणी लिंग्या नावाचा घाट असून त्या घाट परिसरात एक उंच सुळका आहे. या सुळक्याची गावकरी हे पूजा करतात. याला देव मानतात.

Cone at Lingya Ghat
लिंग्या घाटातील सुळका
author img

By

Published : Jul 23, 2022, 1:44 PM IST

Updated : Jul 23, 2022, 1:58 PM IST

पुणे : गेल्या काही दिवसांत राज्यासह पुणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस ( Heavy Rain ) झाला. पावसात सह्याद्रीमध्ये भटकंती करणाऱ्यांची संख्या ही यंदा वाढत असून, नवनवीन ठिकाणी पर्यटक हे गर्दी करू लागले आहे. अनेक गड-किल्ले तसेच सह्याद्रीच्या विविध ठिकाण हे सेल्फी पॉइंट, धबधबे पर्यटकांचे आकर्षण बनू लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात ( Mulshi Taluka ) धामण ओहोळ हे एक गाव ( Dhaman Ohal village ) आहे. या ठिकाणी लिंग्या नावाचा घाट असून त्या घाट परिसरात एक उंच सुळका आहे. या सुळक्याची गावकरी हे पूजा करतात. याला देव मानतात.

लिंग्या घाटावरील सुळका

स्थानिक या सुळक्याला मानतात देव : स्थानिक नागरिक या सुळक्याला देव मानतात. येणाऱ्या पर्यटकांनादेखील वारंवार स्थानिक ग्रामस्थ सांगतात. परंतु, तरीही नागरिक हौसेने, मौजेने येथील सुळक्यावर चढून त्याचे पावित्र्य तर नष्ट करतातच. आणि स्वतःचा जीवदेखील धोक्यात घालतात. तो सुळका खूप निमुळता असतानाही त्यावर अनेक पर्यटक आपला व्हिडीओ, फोटो काढण्यासाठी वर चढतात. आणि धोकादायक पद्धतीने फोटो, व्हिडीओ काढतात. त्या ठिकाणी धरण्यासाठी कुठलीही सुरक्षा नाही. जर एखादा पर्यटक तोल जाऊन खाली पडला तर मोठी दुर्घटनाही घडू शकते.

Cone at Lingya Ghat
लिंग्या घाटावरील सुळका

जिल्ह्याबाहेरूनसुद्धा येऊ लागले पर्यटक : या ठिकाणी पर्यटक पर्यटनासाठी येतात. ते त्या गावातील स्थानिक नागरिकांचे श्रद्धास्थान आहे .त्यालाच लिंगदेव असे संबोधले जाते. ज्या सुळक्यावर चढून पर्यटक व्हिडीओ काढतात. त्या सुळक्याची गावकरी पूजा करतात. त्याला देव मानतात. अनेकदा येथील स्थानिक नागरिकांनी पर्यटकांना सांगण्याचा प्रयत्न केला मात्र ते येथील स्थानिक नागरिकांना न जुमानता त्या धोकादायक सुळक्यावर जाऊन व्हिडीओ फोटो काढण्याचे काम करतात.

स्थानिकांनी सांगूनसुद्धा पर्यटक करतात चुकीचे काम : याबाबत स्थानिक प्रशासनने पावले उचलणे गरजेचे आहे. ज्यामुळे याचे पावित्र्य राखण्यास मदत होईल. आणि पर्यटकांच्या आशा धोकादायक गोष्टींना आळा बसेल. वारंवार सांगूनसुद्धा येथील पर्यटक स्थानिक नागरिकांचे न ऐकता त्यांचे श्रद्धास्थान असणाऱ्या लिंग देवाच्या माथ्यावर पाय देऊन त्याचे पावित्र्य नष्ट करण्याचे काम करत आहेत.

हेही वाचा : Video : वाघासाठी वाहतूक थांबवली; वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्ग केला मोकळा

Last Updated : Jul 23, 2022, 1:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.