ETV Bharat / city

पुण्यात आज तब्बल 743 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे, गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात 600 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. आज पुण्यातमध्ये तब्बल 743 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मंगळवारी देखील कोरोनाचे 661 रुग्ण आढळून आले होते.

The number of corona patients increased
पुण्यात आज तब्बल 743 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
author img

By

Published : Feb 24, 2021, 8:32 PM IST

पुणे: शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे, गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात 600 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. आज पुण्यातमध्ये तब्बल 743 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मंगळवारी देखील कोरोनाचे 661 रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून, नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पुणे शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता, शहर प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे डिसेंबर, जानेवारीमध्ये कोरोना अटोक्यात आल्याचे चित्र होते, मात्र फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आज तब्बल 743 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, गेल्या पाच महिन्यातील सर्वाधिक रुग्णांची नोंद आज झाली आहे. तर आज दिवसभरामध्ये 6 हजार 514 जणांच्या कोरोना चाचण्यात करण्यात आल्या आहेत.

3 हजार 559 कोरोनाबाधितांवर उपचार

पुण्यात सध्या 3 हजार 559 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ऑक्सीजनवर असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 410 इतकी असून, 207 रुग्ण गंभीर आहेत. दरम्यान, आज दिवसभरात 382 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एक रुग्ण शहराबाहेरील आहे. आजपर्यंत पुणे शहरात 4 हजार 837 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकूण 11 लाख 14 हजार 668 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून, यापैकी 1 लाख 99 हजार 696 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. तर त्यापैकी 1 लाख 91 हजार 300 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.